शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमधून ई-बँकिंग सुविधा

By admin | Updated: February 5, 2017 23:26 IST

बीड ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर ई-बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे.

संजय तिपाले  बीडपंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायत स्तरावर ई-बँकिंग सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६३५ ठिकाणी ही केंद्रे निर्माण होत असून, यातून रेल्वे तिकिटापासून ते वीज बिल अदा करण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.जिल्ह्यात १ हजार २३ ग्रामपंचायती असून, सर्वसाधारणपणे १५ लाख रुपये व त्यापेक्षा अधिक निधी प्राप्त असलेल्या ग्रा.पं.मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याकरिता जिल्ह्यातील ६३५ ग्रामपंचायतींनी तयारी दर्शविली असून, त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाशी करार झालेल्या खाजगी कंपनीने ५९८ संगणक परिचालकांची याकामी नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्येच ही ई-केंद्र सुरू होत असून, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा आदी साधनसामग्री ग्रा.पं.ने स्वनिधीतूृन उपलब्ध करून द्यायची आहेत. दरम्यान, ही केंद्रे फेब्रुवारी अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जि.प. प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १८ व १९ जानेवारी रोजी बीड येथे बँक प्रतिनिधींमार्फत विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या सुविधांमुळे गावकऱ्यांना शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.