शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तातील पोलिस कर्मचाऱ्यांना दिला ड्युटीपास

By admin | Updated: August 31, 2014 00:09 IST

परभणी : गणेशोत्सव काळात ड्युटीवर तैनात केलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांस ड्युटीपास देण्यात आले

परभणी : गणेशोत्सव काळात ड्युटीवर तैनात केलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांस ड्युटीपास देण्यात आले असून, या माध्यमातून बंदोबस्तात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केला आहे.२९ आॅगस्टपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गणेशोत्सव आणि यासारख्या इतर उत्सवांमध्ये जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिस प्रशासनावर येऊन पडते. उत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे उत्सव काळात गर्दी वाढते आणि त्याचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. उत्सव कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांततेच्या वातावरणात हा उत्सव साजरा करता यावा, यासाठी पोलिस प्रशासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावतो. तसेच काही प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाते.यावर्षी गणेशोत्सवासाठी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस दलातील ८० टक्के पोलिस बळाबरोबरच बाहेर जिल्ह्यातूनही पोलिस बळ मागविण्यात आले आहे. या पोलिस बलाला ड्युटीचे नियोजन करुन देण्यात आले असून, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याउपरही पोलिस बंदोबस्तात सुसुत्रता आणण्यासाठी यावर्षी ‘ड्युटी पास’ची संकल्पना राबविण्यात आली आहे. अकरा दिवसांचा हा ड्युटी पास असून, तो प्रत्येक कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे या बंदोबस्तात आणखी सुसुत्रता आणण्यास मदत होणार आहे. शिवाय प्रत्येक कर्मचाऱ्यांचा दहा दिवसांचा लेखाजोखा या ड्युटीपासमध्ये मिळणार आहे.कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनागणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा ड्युटीपास देण्यात आला. प्रत्येक बाबीने परिपूर्ण असा ड्युटीपास तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देण्यात आली आहे. तसेच कुठली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळयाची याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऐनवेळी कोणाशी संपर्क करावयाचा झाल्यास जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांकही यात देण्यात आले आहेत.अशी केली बंदोबस्ताची विभागणीजिल्हा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी गणपती मंडळाचे संरक्षण, फिक्स पॉर्इंट आणि पेट्रोलिंग अशा तीन टप्प्पायत बंदोबस्ताची विभागणी केली आहे. या तिन्ही विभागात कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायचे याच्या सूचनाही पासमध्ये देण्यात आल्या. तसेच श्री गणेश प्रतिष्ठापना ते गणेश विसर्जनापर्यंत चेकींग अधिकाऱ्याची सही व शेरा असलेला तक्ताही या पासमध्ये देण्यात आला आहे.