शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

By admin | Updated: December 25, 2015 00:06 IST

औरंगाबाद : ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष सुरू असताना श्रीदत्ताचा जन्म झाला आणि मंदिरामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला,

औरंगाबाद : ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष सुरू असताना श्रीदत्ताचा जन्म झाला आणि मंदिरामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, मंगलवाद्य वाजविले गेले आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीदत्ताच्या विलोभनीय मूर्तीकडे पाहून सर्व जण नतमस्तक झाले. ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन’, अशीच प्रत्येक भाविकाची भावना झाली होती. श्रीदत्त जयंतीनिमित्त असे भारावून टाकणारे वातावरण बीड बायपास रोडवरील संत काशी विश्वनाथबाबा संस्थानच्या दत्त मंदिरात भाविकांनी अनुभवले. शहरातील सर्व श्रीदत्त मंदिरात जयंती साजरी करण्यात आली. काही ठिकाणी दुपारी १२.३० वाजता तर काही ठिकाणी ६.३० वाजता श्रीदत्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला होता. बीड बायपास रोडवरील दत्त मंदिर परिसराला जणू जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या... गणपती, रेणुकामाता, श्रीदत्त आणि सुवर्ण पादुकांची षोडशोपचार पूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर संत काशी विश्वनाथबाबांच्या मूर्ती स्थापनेचा १६ वा वर्धापन दिन झाला. समोर चांदीचा पाळणा ठेवण्यात आला होता. संतोष डासाळकर गुरुजी पाळणा हलवीत होते. शेकडो भाविक ‘दिगंबरा, दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामघोष करीत असतानाच घड्याळात दुपारचे १२ वाजले आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला. यानंतर संस्थानचे अध्यक्ष सोपानराव देशमुख यांनी आरती केली. यावेळी लक्ष्मीनारायण अट्टल, रामकृष्ण वाघ आदी पदाधिकारी हजर होते. जागृत दत्त मंदिर गाणगापूरच्या धर्तीवर सिडको एन- ७ येथील जागृत दत्त मंदिरात श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली. भगवंतांच्या मूर्तीसमोर ५६ भोग नैवेद्याची आरास तयार करण्यात आली होती. दुपारी ४.३० वाजता कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांच्या श्रीदत्त जन्मावरील कीर्तनाला भाविकांनी गर्दी केली. महिलांनी पारंपरिक पाळणा गीते म्हटली आणि भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोहळा यशस्वीतेसाठी गणेश जोशी, संतोष लगामे, राजेश इंजे पाटील, पद्माकर दिवाण, रत्नाकर दिवाण आदींनी परिश्रम घेतले. रात्री परिसरातून पालखी काढण्यात आली. पौरोहित्य उद्धवशास्त्री वझूरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. औरंगपुऱ्यातील सर्वात जुन्या दत्त मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी येथे पाठक गुरुजींचे कीर्तन झाले आणि सायंकाळी दत्त जन्मोत्सवानिमित्त बंडू पुजारी गुरुजी, मधुकर पुजारी, दीपक पुजारी, अमित पुजारी, महेश पुजारी आदींनी आरती केली आणि श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली. रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.