नांदेड : पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचे बी-बियाणे करपली आहे तर धुळ पेरणी मातीत गेल्यात जमा आहे. दरम्यान, पावसासाठी दिंडी, पदयात्रा, भंडारा आदी उपक्रमांचे जिल्हाभरात आयोजन करण्यात येत आहे. गडगा : नायगाव तालुक्यात अद्यापपर्यंत मोठा पाऊस झाला नाही. परिणामी पेरणीस प्रारंभच झाला नसून काही शेतकऱ्यांनी विहिर व बोअरच्या उपलब्ध पाण्यावर कापसाची लागवड केली पण अशातच विहिर, बोअरचे पाणी एकदम कमी झाल्याने पेरणी संकटात सापडली आहे. कृषी विभागाने आपतकालीन पिक परिस्थितीनुसार पेरणीचे नियोजन करण्याचा सल्ला दिला असून पेरणीस जसजशा उशिर होत जाईल तसा संकरित वाणापेक्षा सरळ सुधारित वाणावर अधिक भर देवून बियाणाचे प्रमाण २० ते ३० टक्यांनी वाढवून रासायनिक खतांची मात्रा २५ ते ३० टक्यांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. पावसाअभावी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांकडील चारा संपला असून वाळलेला चारा (कडबा) खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, शासनाने गावनिाहाय मुक्या जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी पशुपालक शेतकरी वर्गातून होत आहे.जून महिन्यात २ टक्के पाऊसहदगाव :तालुक्यात जून महिन्यात केवळ २ टक्के पाऊस झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात निरंक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९६८ मि.मी. आहे. गतवर्षी १२३२ मि.मी. पाऊस झाला होता तर जून २०१३ मध्ये २६१ तर जुलै २०१३ मध्ये ५१० मि.मी. पावसाची नोंद झाली होतीे. यंदा मात्र पावसाने डोळे वट्टारले. तालुक्यातील हदगाव, निवघा, तामसा या तीन मंडळातएकूण काळी माती २७०६३ हेक्टर क्षेत्रात आहे. मध्यम काळी माती ५२०४३ हेक्टर क्षेत्रात तर भरड व इतर २४ हजार ९८० हेक्टर आहे. यापैकी अति हलके क्षेत्र ९६७६ हेक्टर, क्षेत्र, १११८० हेक्टर, मध्यम क्षेत्र ६२०७६ हेक्टर तर भारी क्षेत्र २१ हजार १५४ हेक्टर क्षेत्र आहे. १२ हजार ३१३ अत्यल्प भूधारक शेतकरी आहे. अल्प भूधारकांची संख्या ३३ हजार ५८२ तर इतर मोठे १००७५ शेतकरी आहेत. एकूण खातेदार ५५ हजार ९७० आहेत. तालुक्यात एकूण तृणधान्य सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार ७०० आहे. प्रत्यक्ष पेरणी ८२०० हेक्टर क्षेत्रात झाली असून, एकूण कडधान्य सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ४०० हेक्टर, प्रत्यक्ष पेरणी ९ हजार ७१० हेक्टर, प्रस्तावित पेरणी ९७१० हेक्टर, एकूण तेलबिया ३१ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. चारा, पाणीप्रश्न गंभीर फुलवळ : फुलवळसह परिसरताील पानशेवडी, कंधारेवाडी, गऊळ, अंबुलगा, बोरी बु़, मानसिंगवाडी, भोजूचीवाडी, सोमसवाडी, मुंडेवाडी, ब्रम्हवाडी, जंगमवाडी, बिजेवाडी, नागलगाव, तळ्याचीवाडी, केवळा तांडा, महादेवतांडा आदी गावातील जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ या भागातील सर्व विंधन विहिरी व सिंचन विहिरीने तळ गाठला आहे़ तर बोअरही अचानक बंद पडले आहे़ परिणामी या भागातील शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे़ यावर्षी २० जूनपर्यंत ६६ मि़मी़ इतका पाऊस झाला आहे़ गतवर्षी जून महिन्यात १३२ मि़मी़ पाऊस झाला होता़ पळशात महाप्रसादपळसा: पावसासाठी विरोबा महाराज यांच्या मंदिरामध्ये दिवसभर भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. पळसा व परिसरात केवळ ५ टक्के पेरणी झाली, किन्हाळा, गारगव्हाण, पिंगळी, केदारनाथ, निमटोक, पांगरी, कवाना, बरडशेवाळा येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसासाठी महापंगत, भजन, ११ मारोतीला पाणी घालणे, पायी माहूरला जाणे, आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कामे नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.
धूळ पेरणी मातीमोल
By admin | Updated: July 8, 2014 00:35 IST