शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

‘झालर’च्या आराखड्यावर मंत्रालयात साचली धूळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 19:31 IST

झालरचा तिढा कायमस्वरूपी संपेल, अशी शक्यता सिडको नगररचना विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीनंतरच आराखड्याबाबत विचार होईल, असे दिसते. शासनाने २०१७ मध्ये आराखडा मंजुरीची अधिसूचना काढली;

औरंगाबाद : सिडकोने २६ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून तयार केलेल्या झालर क्षेत्र विकास आराखड्यावर मंत्रालयात धूळ साचली आहे. शासनाने २०१७ मध्ये आराखडा मंजुरीची अधिसूचना काढली; परंतु १८९ आरक्षण बदलांमुळे नकाशांना मान्यता दिली नाही. १८९ आरक्षण बदलांबाबत सुनावणीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्याची अधिसूचना निघाल्यानंतर अंतिम नकाशे मंजूर होतील, त्यानंतर झालरचा तिढा कायमस्वरूपी संपेल, अशी शक्यता सिडको नगररचना विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली. १५ जुलैपूर्वी ही प्रक्रिया पार पडली, तर ठीक, अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतरच आराखड्याबाबत विचार होईल, असे दिसते. 

३० नोव्हेंबर २००८ पासून आजपर्यंत ११ वर्षांचा कालखंड झालर क्षेत्र विकास आराखड्यासाठी गेला असून, या काळात त्या परिसरात ‘शून्य विकास’ झालेला आहे. बांधकाम परवानग्यांतून सिडकोने अंदाजे ४१ कोटी रुपये आजवर घेतले असून, ते झालरच्या नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यात पडून आहेत. अंतिम मंजुरी आणि नियोजन प्राधिकरण म्हणून कुणाला नेमायचा याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत विकास शुल्कापोटी आलेली रक्कम सिडकोला खर्च करण्याचा अधिकार नाही. परिणामी रस्ता, पाणी, मल:निस्सारण सुविधा नसतानाही टोलेजंग बांधकामे ‘झालर’ मध्ये होत आहेत. सूत्रांनी सांगितले ९७ टक्के आराखडा मागेच मंजूर झाला आहे. काही आरक्षणे व झोनबाबत निर्णय होणे बाकी आहे. ३ टक्के आराखड्यासाठी नगररचना सहसंचालकांकडे डिसेंबर २०१८ मध्ये सुनावणी झाली. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत आता मंत्रालयातून अधिसूचना निघेल. १८९ आरक्षणाच्या नोंदीनुसार नकाशे बदलतील. ईपी (एक्सक्लुटेड प्लान) जानेवारी २०१९ पर्यंत बनविण्याची डेडलाईन होती. अद्याप शासनाकडून काहीही निर्णय झालेला नाही. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान सिडकोला बांधकाम परवानगी देणे बंधनकारक आहे. 

सिडकोने एकतर्फी झालर सोडलेसिडकोने झालर क्षेत्र विकास आराखड्यात काम न करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. शासनाने त्यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. सिडकोने आराखडा बनविला याचा अर्थ सिडकोनेच अंतिम विकास करावा, असा होत नाही. सध्या बांधकाम परवानगीतून मिळणारा निधी सिडको बँकेत जमा करीत आहे. इमर्जन्सी एजन्सी म्हणून सिडको झालरमध्ये बांधकाम परवानग्या देत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सगळं काही स्वप्नवत११ वर्षांत झालर क्षेत्र विकास आराखड्यावरून सिडको वादातच राहिले. ३ लाख नागरिकांच्या सेवासुविधांसाठी १५ हजार हेक्टर जमिनीच्या आरक्षणासह नियोजन करण्यासाठी सिडकोने काम सुरू  केले.२०२० पर्यंत आराखड्याचा लाभ नागरिकांना मिळतील, अशी स्वप्ने त्यावेळी दाखविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही होताना दिसत नाही. मुंबई, पुण्याचे विकास आराखडे मंजूर होऊन त्यानुसार कामे सुरू झाली. झालरचा आराखडा मात्र तसाच लटकलेला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcidco aurangabadसिडको औरंगाबाद