शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेचा खोडा

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

राजेश खराडे , बीडमागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आॅनलाईन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे जमा केलेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे. योजनेचे केवळ तीन दिवस उरले असताना जिल्ह्यात केवळ २६९ शेततळ्यांच्या कामांना सुरवात झाली आहे. अनेक शेततळी प्रक्रियेत रखडलेली आहेत. योजनेला सुरुवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. अनुदान रक्कम तोकडी असल्याने अगोदरच शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे. आॅनलाईन ७८५०, तर प्रत्यक्ष कार्यालयात ३७६० अर्ज दाखल झाले आहेत. योजना शेवटच्या टप्प्यात आली तरी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्हाभरात केवळ २६९ शेततळ्यांचा कार्यारंभ झाला आहे. २९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज येण्यास प्रारंभ झाला होता. आॅनलाईनचा घोळ शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्याने एकाच अर्जदाराने अनेक वेळा अर्ज भरले आहेत. त्यामुळे आॅनलाईन प्रस्तावांचा आकडा फुगलेला आहे. अर्ज दाखल होताच त्यानुसार त्याची मोका तपासणी, क्षेत्रीय तपासणी करून पात्र- अपात्र, अर्जांची यादी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडून तांत्रिक अडचणी सोडविल्या जातात व सरते शेवटी विभाग प्रमुखाकडून मंजुरी घेऊन कार्यरंभ होतो. ही प्रक्रीया किचकट असल्याने मंजुरीला विलंब होत आहे. यंदाच्या वर्षाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी १५ एप्रिलची डेडलाईन आहे. आॅनलाईनद्वारे प्रस्तावंचा ओघ वाढत आहे. नियोजनाचा अभावयोजनेच्या सुरवातीपासून आॅनलाईन अर्जाची छाणनी, त्याची नोंद जिल्हा कृषी कार्यालयाकडे होणे गरजेचे होते. तालुकानिहाय किती अर्ज दाखल होत असताना त्याची नोंदही कार्यालयात नव्हती. त्यामुळे अंतिम प्रक्रीयेत गोंधळ उडाला आहे. प्राधान्य कुणाला द्यावेआॅनलाईनद्वारे अर्ज स्वीकरण्यास २९ फेब्रुवरीला सुरवात झाली. वेबसाईटमध्ये सातत्याने अडथळा निर्माण होत असल्याने पहिला मान कुणाला द्यावा हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे. खातरजमा करून घेण्यासाठी एकाच शेतकऱ्याने दोन-दोन वेळा अर्ज भरला आहे. त्यामुळे प्रस्तावांचा आकडा फुगला असला तरी छाणनीमध्ये अधिकाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. जनजागृतीचा आभावसध्याची दुष्काळी परिस्थितीमुळे प्रशासकीय स्तरावर मागेल त्याला शेततळे योजनेला अन्यनसाधारण महत्व होते. त्यानुसार जनजागृती करण्याच्या सुचना वेळोवेळी देण्यात येत होत्या. पोस्टरबाजी, योजनेची माहिती, गावस्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. काही तालुके वगळता शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांचीही योजनेबाबत उदासिनता होती.