शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाला भूसंपादनाचा खोडा

By admin | Updated: May 23, 2016 01:22 IST

औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे.

औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे. जागा मिळवून देण्यासाठी मनपा आणि रस्ते विकास महामंडळाचा पत्रव्यवहाराचा खेळ सुरू असल्यामुळे पुलाचे उद्घाटन पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या रोडवर तो पूल बांधण्यात आला आहे. मुळात वाहतुकीचा रेटा हा नगरनाका ते जालना रोड या दिशेने होता. त्यामुळे पूल या दिशेने बांधला जावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. परंतु पुलाची दिशा बदलली नाही. रेल्वेस्टेशन ते बसस्थानक हा रोड मनपाच्या विकास आराखड्यातील रोड आहे. त्या रोडचे रुंदीकरण करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. म्हाडा आणि बाबा पेट्रोलपंपाच्या बाजूचे दोन्ही सर्व्हिस रोड अरुंद आहेत. त्यामुळे पूल वाहतुकीस खुला व सुरळीतपणे होणे शक्य नाही. सर्व्हिस रोडचे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन गरजेचे आहे. मनपाकडे भूसंपादन करून देण्यासाठी रक्कम नाही. टीडीआर देण्यासाठी पालिकेची तयारी आहे. परंतु जागा मालक टीडीआर घेण्यास तयार नाहीत. पुलाच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. याप्रकरणी रस्ते विकास महामंडळाने मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. कार्यकारी अभियंता विक्रांत जाधव म्हणाले, सर्व्हिस रोडसाठी भूसंपादन महत्त्वाचे आहे. ते झाल्यानंतर रुंदीकरण होईल. सध्या पुलाच्या लोकार्पणाची तारीख सांगणे अवघड आहे.