शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थकीत रक्कमेवरून वीज वितरण कंपनी व नगर पालिकेत द्वंद्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 16:34 IST

नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी वीज वितरणने पालिकेची ३ दिवसापूर्वी वीज कापली आहे. या विरोधात आता पालिकेने  विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे. 

ठळक मुद्देमाजलगांव नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत.पालिकेने  विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे. 

 ऑनलाईन लोकमत

माजलगांव ( जि. बीड ), दि. ३ : माजलगांव नगर पालिकेकडे वीज वितरणचे ७ लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी वीज वितरणने पालिकेची ३ दिवसापूर्वी वीज कापली आहे. या विरोधात आता पालिकेने  विविध करांपोटी कंपनीवर जवळपास पावने दोन कोटींची बाकी काढत नोटीस बजावली आहे. 

जिल्ह्यात माजलगांव नगर पालिका कायम चर्चेत असते. यावेळी चर्चा आहे वीज वितरण कंपनीने पालिकेच्या खंडित केलेल्या सेवेची. पालिकेच्या विविध विभागांकडे वीज वितरणची ७ लाखाची थकबाकी आहे. कंपनीने धडक कारवाई करत पाणी पुरवठा विभागाच्या फिल्टरसह कार्यालयातील विजपुरवठा खंडीत केला आहे. परंतु; शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवु नये म्हणुन पालिकेच्या बाकी भरण्याच्या आश्वासनवर फिल्टरवरील विजपुरवठा सुरु केला. मात्र, कार्यालयाचा विजपुरवठा अद्यापही खंडीतच आहे. 

पालिकेने २ वर्षांपूर्वी ५ लाख रुपये वीज बिल थकबाकी असतांना केवळ २ लाख रुपये भरले होते. हि बाकी वाढत जाऊन आता जवळपास  ७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. अनेकवेळा सांगुन देखील बिलाची रक्कम न भरल्यामुळे शेवटी कंपनीने विजपुरवठा खंडीत केला. कंपनीने कार्यालयाचा विजपुरवठा खंडीत केल्यानंतर पालिका प्रशासन हि आता खडबडून  जागी झाले आहे. पालिकने कंपनीस विविध करांपोटी सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांच्या बाकीची नोटीस दिली आहे. कर भरा अन्यथा कंपनीचे कार्यालय सिल करण्याचे यात म्हटले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी आणि पालिका यांच्यात थकीत रक्कमेपोटी चांगलेच द्वंद्व पहायला मिळत आहे.

 खाजगी विजधारकाचा आधार तीन दिवसांपासुन विज पुरवठा खंडीत असल्यामुळे पालिकेने दैनंदिन कामकाजासाठी इमारतीच्या शेजारील एका खाजगी घरातुन विज पुरवठा घेतला आहे. 

कंपनीच्या कार्यालयास सील ठोकणारपालिकेकडे वीज बिलापोटी असलेली थकीत रक्कम व पालिकेची कंपनीकडे असलेली करापोटी थकीत रक्कम यात मोठी तफावत आहे. कंपनीने आमच्या कार्यालयाची बाकी भरुन घ्यावी व उर्वरित रक्कमेचा भरणा करावा. अन्यथा कंपनी कार्यालयाल सिल ठोकण्यात येईल. - बी. सी. गावित, मुख्याधिकारी 

थकीत बिलामुळे केली कारवाई पालिकेला दोन वर्षांपासून विजबिल भरण्या बाबत अनेकवेळा नोटीस दिली आहे. तरीही  बाकी न भरल्यामुळे आम्ही विज पुरवठा खंडीत केला. - सी. एम. चौधरी, कनिष्ठ अभियंता