शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
3
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
4
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
7
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
8
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
9
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
10
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
11
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
12
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
13
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
14
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
15
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
16
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
17
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
18
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
19
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
20
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी होत असल्याने विद्यापीठाच्या विकासावर परिणाम - कुलगुरू बी.ए. चोपडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:53 IST

ब्लॅकमेलिंगसाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे. ऐवढेच नाही तर विद्यापीठाचा विकास थांबला असल्याची हतबलता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक लोक काहीही संबंध नसताना आंदोलने, उपोषणे करतात. आंदोलनकर्त्याला माहितही नसते की आपला वापर  कोण करत आहे. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक लोक काहीही संबंध नसताना आंदोलने, उपोषणे करतात. या लोकांच्या मागे काही शक्ती असतात. या शक्तीच ब्लॅकमेलिंगसाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे. ऐवढेच नाही तर विद्यापीठाचा विकास थांबला असल्याची हतबलता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र विभागाच्या उदघाटनाला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक येत आहेत. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरूंनी विविध विषयांवर भाष्य केले. नव्याने स्थापन झालेल्या या विभागापूर्वी नाट्यशास्त्र विभागात योगाविषयी पदविका अभ्यासक्रम शिकविण्यात येत होता. या अभ्यासक्रमाला असलेल्या शिक्षकापासून ते मानधनापर्यत सर्व माहिती एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात मागवली आहे. यानंतर दिलेल्या माहितीवर संंबंधित व्यक्तीचे समाधान झाले नसल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या  उपोषणाविषयी कुलगुरूंना विचारले असता, संबंधित व्यक्तीला सर्व ती माहिती देण्यात आलेली असल्याचे योगा विभागाचे समन्वयक व नाट विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी सांगितले. दिलेल्या माहितीवर संबंधितांचे समाधान झाले नसेल तर याविषयी अपिलिय अधिका-याकडे अपिलाच अर्ज केला पाहिजे. याविषयी कोणताही अर्ज न करता थेट उपोषणाला बसला असल्याचे डॉ. शेवतेकर म्हणाले. 

यानंतर कुलगुरूं म्हणाले, विद्यापीठातील वेगवेगळ्या आंदोलनाला काही अदृश्य लोक फुस लावतात. आंदोलन पेटवून देतात. नंतर या आंदोलनाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करतात. हे चुकीचे आहे. आंदोलनकर्त्याला माहितही नसते की आपला वापर  कोण करत आहे. याचा परिणाम विद्यापीठाच्या विकासावर होत आहे. हे मराठवाड्यासाठी चांगले नसल्याची कबुलीही कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद