शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल कारकुनाच्या आत्महत्येच्या धमकीने प्रशासनाची उडाली भितीने गाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:01 IST

जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला.

ठळक मुद्दे आयुक्तांना दिले लेखी पत्र : आत्महत्या करणार असल्याचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल केल्याने सगळ्यांचीच धावपळ

औरंगाबाद : जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. अव्वल कारकून राजेंद्र बागडे यांनी आत्महत्या करीत असल्याचे धमकीपत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची भीतीने गाळण उडाली.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोयगाव येथे केलेल्या बदलीला स्थगिती मिळावी, यासाठी बागडे यांनी मॅट, कोर्टातून स्थगिती मिळविल्यानंतरही त्यांची बदली रद्द झाली नाही. न्यायालयीन आदेशांना प्रशासन जुमानत नसल्याच्या वैतागातून त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना आत्महत्या करीत असल्याचे हस्तलिखित पत्र दिले. ते पत्र त्यांनी जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह महसूल प्रशासनाच्या सोशल मीडिया गु्रपमध्येही व्हायरल केले. पत्रात बागडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, प्रशासनासह कर्मचारी संघटना व नातेवाईकांनी त्यांचा दिवसभर शोध सुरू केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिसांनादेखील याप्रकरणी सूचना दिल्या. सायंकाळपर्यंत बागडे यांचा फोन न लागल्यामुळे मोबाईल ट्रॅकरद्वारे ते औरंगाबाद लेणी परिसरात असल्याचे लक्षात आले. महसूल अधिकारी, पोलिसांनी त्यांना तेथे समजावले. दरम्यान, त्यांना आकाशवाणी परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर आदींनी बागडे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बागडे यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आस्थापना अधिकारी, महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केले. जिल्हाधिकाºयांसह प्रशासनातील कुणीही दाद देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.एकूण कर्मचाºयांच्या तीस टक्के बदल्या करता येतात. ६५ मंडळ अधिकाºयांपैकी ३८ जणांच्या बदल्या केल्या. तेथे १८ जण बदलीसाठी पात्र होते. बदल्यांमुळे शासन आदेशाची पायमल्ली झाली आहे. ज्यांचे एक वर्ष सेवेचे उरलेले आहे. त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ३६ कर्मचाºयांचे मुख्यालय बदलण्यात आल्याचे मत संघटनेने व्यक्त केले. दरम्यान, महसूल कर्मचारी संघटनेचे सतीश तुपे, अनिल सूर्यवंशी यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाºयांची भेट घेतली....तर बागडेंवर कारवाई होऊ शकतेआॅनलाईन फेरफार प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारीसंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चौकशी करून बागडेंना निलंबित केले होते. त्यावेळी बागडे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निलंबन आदेशाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून स्थगिती मिळविली. राम यांनी बागडेंच्या तक्रारीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवून निलंबन कारवाई योग्यच असल्याचे म्हटले होते. डॉ. भापकर यांच्याकडे त्यावर सुनावण्या झाल्या. मात्र, अंतिम आदेश दिले नाहीत. आयुक्तांनी निर्णय दिला, तर प्रशासनाला वेठीस धरणे, शिस्तभंग केल्यावरून बागडे यांच्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासन गुरुवारी आयुक्तांना बोलणार आहे.पोलिसांत बागडेविरोधात तक्रारजिल्हा प्रशासनाने अव्वल कारकून बागडे यांच्या विरोधात सिटीचौक पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी सांगितले, याप्रकरणी जिल्हाधिकाºयांमार्फत तक्रार प्राप्त झाली आहे. अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून, चौकशी अंती निर्णय होईल.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय