शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे पीक किडीमुळे धोक्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:29 IST

बीड : गत आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांनी काही भागात तग धरली आहे. मात्र आता सोयाबीनच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव

बीड : गत आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांनी काही भागात तग धरली आहे. मात्र आता सोयाबीनच्या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले आहे. सोमवारी कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची पुरती वाताहत झाली आहे. उशिराने का होईना पाऊस पडल्यामुळे अंबाजोगाई, माजलगाव, केज, बीड या तालुक्यात सोयाबीनचे पीक काही प्रमाणात आले आहे. मात्र आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोमवारी गायकवाड यांनी माजलगाव तालुक्यातील आबेगाव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनची पाहणी केली असता तेथे हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. अशीच परिस्थिती अंबाजोगाई, बीड व केज तालुक्यात आहे. नेमके यावर्षी जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला नसल्याने हुमणी अळीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आता सोयाबीनचे पीक धोक्यात आहे. विशेषत: हलक्या व कमी पाण्याच्या जमिनींमध्ये असलेल्या सोयाबीनला जास्त प्रमाणात ही कीड लागलेली असल्याचे आढळून येत आहे. निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट करणे आवश्यक आहे. याशिवाय जमिनी ४८ १० टक्के किंवा फिफ्रोनिल ३ टक्के किलो प्रती हेक्टर याप्रमाणे द्यावे. झाडावरचे भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबुच्या काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि ते गोळा करुन रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्या नष्ट कराव्यात, प्रादुर्भाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे हुमणी अळीला सामूहिकरीत्या प्रयत्न करुन नष्ट केले तरच नियंत्रण करणे शक्य आहे. (प्रतिनिधी)