शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खड्ड्यांमुळे महिलेची रिक्षात प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:04 IST

गारज-देवगाव रंगारी मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास खड्ड्यांमुळे गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यातील गारज-देवगाव रंगारी मार्गावर मंगळवारी दुपारच्या सुमारास खड्ड्यांमुळे गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली. सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला; मात्र काही वेळेतच सदर बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा येथील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन रस्त्याची दुरुस्ती हाती घेईल, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ वाजता तालुक्यातील गारज येथून चेहंदीबाई कृष्णा मोर (रा. सेंदवा, मध्यप्रदेश, ह.मु. जांबरखेडा) ही सहा महिन्यांची गर्भवती महिला देवगाव रंगारी येथे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात होती; मात्र रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे जांबरखेडा फाट्यावर सदर महिला रिक्षातच प्रसूत झाली. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दरम्यान, तत्पूर्वी सकाळी सदर महिलेला गारज येथे डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते; मात्र येथील डॉक्टरांनी तपासणीला देवगाव रंगारी येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पतीने चेहंदीबाईला देवगाव रंगारीला जाण्यासाठी अंकुश साळुंके यांच्या रिक्षात बसवले; मात्र गारज ते देवगाव रंगारी या सात कि.मी अंतरात मोठे खड्डे असल्याने रिक्षा आदळून सदर महिला रिक्षातच प्रसूत झाली.यावेळी नवजात शिशूला वेळेवर उपचार न मिळाल्याने व सहाव्या महिन्यातच प्रसूत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयापासून खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे; मात्र हे जाळे कधीच विरले असून, सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.सरकारने आतापर्यंत गरोदर माता, जन्माला येणारे बालक, अंगणवाडी बालक, शालेय बालक ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत; मात्र या योजना केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.