शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे चिमुकला २ तासांत पुन्हा वडिलांकडे पोहोचला

By admin | Updated: September 10, 2016 00:28 IST

औरंगाबाद : अवघा तीन ते साडेतीन वर्षांचा चिमुकला कोठून तरी चालत थेट गुलमंडीवर आला.... कावराबावरा फिरत असलेला हा बालक पोलिसांच्या नजरेस पडला

औरंगाबाद : अवघा तीन ते साडेतीन वर्षांचा चिमुकला कोठून तरी चालत थेट गुलमंडीवर आला.... कावराबावरा फिरत असलेला हा बालक पोलिसांच्या नजरेस पडला आणि त्यांनी त्याची विचारपूस केली असता, त्यास त्याचे नावही सांगता येत नव्हते. असे असताना पोलिसांनी दोन तास प्रयत्न करून आणि व्हॉटस्अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून त्याच्या वडिलाचा शोध घेतला आणि त्यास त्यांच्या ताब्यात दिले. रियान सलीम शेख (रा. सब्जीमंडी, पैठणगेट) असे या बालकाचे नाव. मंगळवारी दुपारी तो एकटाच घराबाहेर पडला आणि खेळत, खेळत चालत थेट गुलमंडीवर पोहोचला. सध्या गणेशोत्सव असल्याने गुलमंडीवर मोठी गर्दी असते. या गर्दीतून एकटाच कावराबावरा फिरत असलेला हा चिमुकला सिटीचौक ठाण्यातील नाईक कॉन्स्टेबल फिरोज पठाण, पोलीस क र्मचारी परवेज खान, महिला पोलीस घनसावत यांंना दिसला.त्यांनी त्यास जवळ बोलावून त्याचे नाव विचारले. मात्र घाबरलेल्या बालकास त्याचे नावही सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यास दुचाकीवर बसवून पोलिसांनी सिटीचौक ठाण्यात नेले. तत्पूर्वी पैठणगेटकडून एका ज्यूस सेंटरसमोरून जात असताना तो एक जणाला पाहून पप्पा म्हणाला. त्यामुळे पठाण हे त्या व्यक्तीकडे गेले. तेव्हा हा आपला मुलगा नाही, असे त्या व्यक्तीने सांगितले. तेथील दुसऱ्या ज्यूस सेंटरसमोरून जात असताना तो पुन्हा पप्पा म्हणाला. यावरून पोलिसांना अंदाज आला की, याचे कोणी तरी ज्यूस सेंटरशी संबंधित आहे. यावेळी ज्यूस सेंटरचालकांसह विविध लोकांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर या चिमुकल्याचा फोटो पाठवून त्याच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर काही वेळाने रियानचे वडील ज्यूस सेंटरवर आले. आपला मुलगा हरवला आहे, असे त्यांनी ज्यूस सेंटरचालकांना सांगितले. त्यानंतर सिटीचौक ठाण्यात ते गेले असता तेथे रियान हा एका महिला पोलिसासोबत खेळत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे चिमुकला दोन तासांमध्ये वडिलांपर्यंत पोहोचला.