शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पेठबीडच्या गुन्ह्यांमुळे पोलीस दल बदनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:36 IST

पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे येथीेल जनता भयभीत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे येथीेल जनता भयभीत झाली आहे. तडीपार केलेले आरोपी सर्रास खुलेआम फिरणे, गोळीबार, तसेच या भागात चालत असलेला बनावट नोटांचा कारखाना इ.चा समावेश आहे. केवळ पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दल बदनाम होत आहे.पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकावर टिच्चून बनावट नोटा तयार करणा-या कारखान्याचा मध्यप्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केला. तसेच गतमहिन्यात तरुणावर गोळीबार झाला. याचा अद्यापही तपास लागला नाही. त्यातच तडीपार केलेले आरोपी सर्रास या परिसरात खुलेआम फिरत आहेत. अशा वाढत्या गुन्ह्यांमुळे जिल्हा पोलीस दल बदनाम होत चालले आहे. विशेष म्हणजे केवळ पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ होत असल्याने येथील अधिकारी, कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.एकीकडे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पो.नि. घनश्याम पाळवदे, पो.नि. दिनेश आहेर, सपोनि श्रीकांत उबाळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे दिवाळीचा सण शांततेत पार पडला; परंतु पेठबीड पोलीस ठाण्यात मात्र गुन्हेगारी थांबली नाही.पेठबीड पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे दिवाळीतही येथे गुन्हे होतच राहिले. एका पोलीस ठाण्यामुळेच जिल्हा पोलीस दल बदनाम होत आहे. येथील अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी करून वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पेठबीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव म्हणाले, बनावट नोटांची कारवाई मध्य प्रदेश पोलिसांनी केली आहे. आम्ही त्यांना सहकार्य केले. तसेच गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाळवदे म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.