शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ

By admin | Updated: July 2, 2014 00:16 IST

माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़

माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़ मंडळाने याची तात्काळ दखल घेऊन घेण्याची मागणी होत असून या बस स्थानकात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाचे येथे नवीन व जुने बसस्थानक आहे़ नवीन बसस्थानकावरुन निघालेल्या प्रत्येक बसने जुन्या बसस्थानकात जाऊन तेथील प्रवाशांना घेणे बंधनकारक आहे़ त्याप्रमाणे माजलगाव आगाराच्या बसेस थांबतही होत्या़ आता नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत़ तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात बसने येऊन जुन्या बसस्थानकात उतरतात़ तेथून परत जातात़ शेकडो शासकीय कर्मचारीही जुन्या बसस्थानकाचाच वापर करतात़ तसेच इतर शेकडो प्रवासी जुन्या बसस्थानकात उभे असतात़ असे असताना मागील एक महिन्यापासून माजलगाव, परभणी, बीड आगाराच्या चालक हे बस बसस्थानकात न आणता बाहेरुनच पुढे नेत आहेत़ त्यामुळे बस पकडण्यासाठी विद्यार्थी, वृध्द, महिला-पुरुषांना स्थानकातून बाहेर रस्ता ओलांडून बसमागे पळावे लागते़ तोपर्यंत बस निघून जाते़ या तारांबळीत वृध्दांना दम लागतो तर रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी असल्याने अनेकदा अपघात घडतात़बसेस निघून गेल्याने विद्यार्थ्यांना खसगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन मिळेल त्या वाहनाने गावी जावे लागते अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडत असून मानसिक त्रास होत असल्याने आगार प्रमुखांनी याची तात्काळ दखल घेऊन सर्व आगाराच्या बसेस जुन्या बसस्थानकात नेमण्योच आदेश देऊन कायमस्वरुपी कंट्रोलर तेथे नियुक्त करावा, अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड़ दत्ता रांजवण, अभिजीत कोंबडे, विक्रम शिंदे, सिध्देश धारक, धारक, ज्ञानेश्वर जुनाळ, प्रसाद खोलेंंनी दिला आहे. (वार्ताहर)विद्यार्थी घेतात खाजगी वाहनांचा आधारमागील अनेक दिवसांपासून जुन्या बसस्थानकात येत नाही बसमहामंडळातील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्येचे नाही गांभीर्यविद्यार्थ्यांमधून व्यक्त होतोय संताप