शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बस न मिळाल्याने ट्रक करून दिवाळीसाठी गावी निघालेल्या नागरिकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 2 ठार 12 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 13:58 IST

पुण्याहून बुलढाण्याला दिवाळीसाठी टेम्पोने घरी जात असलेल्या नागरिकांचा करमाड जवळ अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले आहेत.

ठळक मुद्दे पुण्यातील बस स्थानकात आले मात्र, एस टी बस कर्मचा-यांचा संप असल्याने त्यांना बस मिळाली नाही.चालकांचे ट्रक वरील  नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यावरील डीवायडरवर धडकली व उलटी झाली.

औरंगाबाद : पुण्याहून बुलढाण्याला दिवाळीसाठी टेम्पोने घरी जात असलेल्या नागरिकांचा करमाड जवळ अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर ११ जण गंभीर जखमी आहेत. यातील एकाची परिस्थिती अत्य्नात नाजूक आहे.ही घटना आज पहाटे करमाड जवळील गोलटगाव फाट्यावर घडली.

या बाबतअधिक माहिती अशी कि , पुणे परिसरात चाकण येथे बुलढाणा जिल्ह्यातील  खळेगाव, सिंदखेडराजा व जवळील गावातील 20 ते 30 नागरिक खाजगी नोकरी करतात. त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने ते गावी जाण्यास निघाले. पुण्यातील बस स्थानकात आले मात्र, एस टी बस कर्मचा-यांचा संप असल्याने त्यांना बस मिळाली नाही.

यामुळे नाईलाजाने त्यांनी भाड्याचा ट्रक करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासा दरम्यान सकाळी करमाड गावाजवळ गोलटगाव फाट्याच्या वळणावर चालकांचे ट्रक वरील  नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यावरील डीवायडरवर धडकली व उलटी झाली. यात समोरच्या कॅबिन मध्ये असलेले चालक पुरुषोत्तम किसन वायाळ (40, रा खळेगाव) प्रवासी प्रकाश भुत्तेकर (30,रा. बुलढाणा) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर मागे बसलेले 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.ट्रकमध्ये 30 च्या जवळपास प्रवासी होते यामुळे जखमींचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. 

या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले. काहींना घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.