शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा दाखल केल्याने बाळाचा गर्भातच मृत्यू

By admin | Updated: July 16, 2017 00:18 IST

बीड : पोटात कळा सुरू झाल्याने मातेला गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोटात कळा सुरू झाल्याने मातेला गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी केवळ एकदाच तपासणी केली. त्यानंतर प्रसुतीची वाट पाहून तब्बल १२ तासांनी जिल्हा रूग्णालयात ‘रेफर’ केले. दरम्यानच्या काळात मातेसह बाळाची प्रकृती गंभीर बनली. येथे आल्यानंतर डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामध्ये त्यांना केवळ मातेला वाचविण्यात यश आले, बाळाचा मात्र दुर्दैवाने गर्भातच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बीड जिल्हा रूग्णालयात घडली.रीना सुनील दळवी [२४ रा.पुणे ह.मु.गढी (माहेरी आली होती)] यांना शुक्रवारी सायंकाळी कळा येऊ लागल्या. तात्काळ गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. प्रसुतीसाठी वेळ लागेल, उपचार सुरू आहेत, असे सांगून डॉक्टर निघून गेले. परंतु रीना यांच्या कळा थांबत नव्हत्या. नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली. परंतु डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे परिचारिकांना सांगितले. त्यांनी रीनाला तपासण्याची गरज नाही, असे सांगून दुर्लक्ष केले. येथील एका परिचारिकेने प्रसूती सकाळी सहा वाजता होईल, असे सांगितल्याने वाट पाहिली. परंतु रीना यांची प्रसुती होण्याऐवजी प्रकृती गंभीर बनत होती. पुन्हा विचारणा केली असता डॉक्टरांनी तुम्ही बाहेर जा, असे सांगितल्याचे रीनाचे वडील गायकवाड म्हणाले. सकाळी आठ वाजता डॉ.रौफ यांची ड्यूटी संपल्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर आलेल्या डॉक्टरांना रीनाच्या प्रकृतीची माहिती देत तपासणीची मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी त्यांनी रीना यांचे सिझर करावे लागेल. आपल्याकडे सुविधा नाही, असे सांगून जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रूग्णवाहिकेतून रीनाला सकाळी ११ वा.च्या सुमारास जिल्हा रूग्णालयात आणले. येथे डॉ. केकान यांच्यासह परिचारिकांनी तपासणी करून सिझर केले. यामध्ये बाळ गर्भातच दगावले, तर माता बचावली.