शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतीतील विज्ञानाकडे दुर्लक्षामुळे दुष्काळ

By admin | Updated: June 27, 2016 01:02 IST

औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे

औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे. तरी आपल्याकडे पाणीटंचाई जाणवते. शेती बेभरवशाची झाली आहे. त्याला प्रामुख्याने जुन्या शेती परंपरेतील विज्ञानाकडे झालेले दुर्लक्ष आणि शेतीचा नष्ट झालेला मूळ आधार या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून सद्य:स्थितीवर मात करायची असेल तर येत्या काळात शेतीच्या परंपरा, त्यातील विज्ञान आणि जीवनपद्धती यांची सांगड घालावी लागेल, तसेच पावसाला सुसंगत पिके घ्यावी लागतील, असे मत शेती क्षेत्राचे अभ्यासक आणि उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी व्यक्त केले.तरुण पत्रकारांच्या वतीने आयोजित अभ्यास वर्गात ते बोलत होते. ‘बेभरवासी पाऊस आणि मराठवाड्यातील शेती’ या विषयावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, दुष्काळ हा काही आजचा नाही. अगदी यंदाच्या दुष्काळापेक्षाही किती तरी वेळा औरंगाबादेत आणि मराठवाड्यात दुष्काळ पडल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. परंतु त्यावेळी परंपरागत शेतीत एक अशी जीवनपद्धती अस्तित्वात होती की, ज्यामुळे दुष्काळावर मात करणे शक्य होते. आज आपल्याकडे सरासरी ७०० मि. मी. पाऊस पडतो. म्हणजे शेतीत एकरी ७० लाख लिटर पाणी पडते, पण दुर्दैवाने त्यातील २५ ते ३० लाख लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते हे अभ्यासात आढळून आले आहे. पूर्वी बांधावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असत. त्या जमिनीतील पाणी धरून ठेवत, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करीत. आज वनस्पतीही बदलल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज बाष्पीभवन ही शेतीसमोरील सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. पूर्वी पाणवठे संरक्षित करण्याचे कौशल्य अवगत होते. शिवाय पशुआधारित शेती हा शेतीचा मूळ आधार होता. आता हा आधारच नष्ट झाला आहे. अलीकडच्या काळात उपलब्ध पाण्याचा विचार न करता पिके घेतली जात आहेत. कापूस हे सरासरी ७०० मि. मी. पावसावर येणारे पीक आहे. मात्र आपल्याकडे वैजापूरसारख्या ३०० मि. मी. सरासरी पाऊस असलेल्या तालुक्यातही कापसाचे क्षेत्र वाढते आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून येत्या काळात पाणी शेतात मुरेल अशा वनस्पती बांधावर लावाव्या लागतील. पावसाला सुसंगत अशी ४०० मि. मी.वर सरासरी येणारी पिके आणि २-३ महिन्यांत येणारी पिके यांची सांगड घालावी लागेल, तरच आपली शेती पुन्हा पूर्वपदावर येईल, असेही देवळाणकर म्हणाले.