शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मूल्यमापनाअभावी साथरोग निदान प्रयोगशाळा रखडली !

By admin | Updated: October 1, 2016 01:19 IST

सितम सोनवणे , लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केंद्र शासनाच्या धोरणानुसार व्हायरल डायग्नोस्टिक लॅबसाठी शासनाकडे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

सितम सोनवणे , लातूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केंद्र शासनाच्या धोरणानुसार व्हायरल डायग्नोस्टिक लॅबसाठी शासनाकडे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. २०१३ साली शासनाने प्रस्तावाची मागणी केली होती. त्यात जागा मूल्यमापनाची त्रुटी निघाल्याने हा प्रस्ताव परत महाविद्यालयाकडे आला होता. या त्रुटीसंदर्भात महाविद्यालयाने बांधकाम विभागाला कळवूनही चार महिन्यांपासून बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या मूल्यमापन प्रमाणपत्राअभावी साथरोगनिदान प्रयोगशाळेचा प्रस्ताव रखडला आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या धोरणानुसार बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, औरंगाबाद, यवतमाळ, लातूर व कोल्हापूर यांची निवड व्हीडीएल लॅबसाठी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून त्या संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले असून, साथरोगनिदान प्रयोगशाळा (व्हायरल डायग्नोस्टिक लॅब) निर्मितीच्या सूचना शासनाने केल्या असून, या योजनेअंतर्गत लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून २०१३ साली केंद्र शासनाने प्रस्ताव मागविला होता. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर यांनी तो शासनाकडे पाठविलाही होता. त्यात त्रुटी काढून २०१५ साली हा प्रस्ताव पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या त्रुटीअंतर्गत लॅब निर्मितीसाठी लागणाऱ्या जागेचे मूल्यमापन बांधकाम विभागाकडून करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित प्रस्तावात जोडणे आवश्यक आहे. या त्रुटीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रस्ताव हाती पडताच बांधकाम विभागाकडे अधिष्ठातांनीपत्र पाठवून बांधकाम विभागाला व्हीडीएल लॅबच्या जागेच्या मूल्यमापनाच्या सूचना केल्या आहेत. याला तब्बल चार महिने उलटूनही गेले आहेत. तरीही बांधकाम विभागाने या जागेचे मूल्यमापन केले नाही. या प्रयोगशाळेसाठी राज्य शासनाचा वाटा २५ टक्के व केंद्र शासनाचा ७५ टक्के मिळणार आहे. या इमारतीच्या मूल्यांकनात २५ टक्के समावेश केला जाणार आहे. त्यानंतरच केंद्र शासनाचे ३ कोटी ५ वर्षांत निधी मिळणार आहे. प्रस्तावातील आलेल्या त्रुटीनुसार बांधकाम विभागाला जागेच्या मूल्यमापनासाठी सूचना केल्या आहेत. त्याला चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यांनी मूल्यमापन करताच या साथरोग प्रयोगशाळेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.