शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील फरशी तापल्याने गूढ वाढले

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील एकाच ठिकाणची फरशीवर उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे ज्वालामुखी आहे की पाण्याच्या वाफेमुळे होतेय याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवीस वर्षांपूर्वी किल्लारी भूकंपाच्या वेळेस गावात सौम्य धक्के जाणवले होते. भिमराव किसनराव अंभोरे यांचे गावात भर वस्तीत घराचे पाच वर्षां पूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. याच घरात बैठक खोलीला लागून एक खोली आहे. उन्हाळ्यातील गरमीचे दिवस असल्याने भागूबाई भीमराव अंभोरे या रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून घरात आले असताना खोलीतील फक्त बारा फरशा तापल्याचे लक्षात आले.एकाच ठिकाणी फरशी तापल्याचे पाहून एक फरशी खोदून काढली असता खोदकाम केल्याच्या ठिकाणी पाणी टाकून पाहिली असता पाणी सुद्धा गरम झाले. त्यामुळे घरातील सदस्य आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. या गूढ घटनेची माहिती तहसील कार्यालयासही कळविण्यात आली. मंडळ अधिकारी एस. डी. भदरर्गे, तलाठी विजय गरड, व्ही. आर. इंगोले, अ‍ॅड रामेशवर अंभोरे, माजी सरपंच विजय अंभोरे यांनी घटना स्थळाची पाहणी करून याची माहिती तहसीलदार यांना दिली. या विषयी तहसीलदार जे.डी.वळवी म्हणाले याची माहिती पोलिसांना दिली आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाला माहिती देण्यात येऊन सद्या स्थितीत घरातील कुटुंबास सावध राहून तात्पुरती इतरत्रे व्यवस्था करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.