शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे जिल्हा परिषदेची घडी विस्कटली, औरंगाबादमधील स्थिती, अनेक कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:31 IST

‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटदारांनी कामाकडे पाठ फिरवली आहे.

- विजय सरवदे

औरंगाबाद : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटदारांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. दहा दिवसांपूर्वीच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवी जिल्हा दर सूची (डीएसआर) जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये विविध साहित्यांचा दर हा ‘जीएसटी’ लागू होण्यापूर्वीच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी कामे करण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे. त्यामुळे जवळपास ३०-४० कोटींची कामे ठप्प झाली आहेत.कंत्राटदारांसोबत वाटाघाटी करून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने मंजूर निविदेतील दर आणखी कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. वित्त विभागाच्या अधिकाºयांनी कंत्राटदारांशी संपर्क करून दर कमी करण्याबाबत वाटाघाटीचा प्रस्ताव ठेवला; परंतु निविदेमध्ये अगोदरच आम्ही अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराने (बिले) कामे स्वीकारलेली आहेत. त्यात आणखी दर कमी केल्यास आम्हाला ते परवडणारे नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे.वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जुलैमध्ये ‘जीएसटी’ लागू झाला. तत्पूर्वीच एक जुलैच्या अगोदर सिंचन, बांधकाम, पाणीपुरवठा व अन्य विभागांच्या सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा जाहीर झाल्या होत्या. त्यांचे अंदाजपत्रक हे २०१३-१४ च्या ‘डीएसआर’नुसार तयार करण्यात आले होते. मंजूर निविदांनुसार कार्यारंभ आदेश (वर्कआॅर्डर) देण्याची प्रक्रिया राबविली जाणार होती. त्याच काळात ‘जीएसटी’ लागू झाल्यामुळे ही कामे जुन्या दराने करायची की नवीन करप्रणालीनुसार करायची, असा पेच कंत्राटदारांसमोर निर्माण झाला. पूर्ण झालेल्या कामांच्या बिलांतून ‘जीएसटी’ वजा करू नये, अशी मागणी कंत्राटदारांनी केली होती.

टॅग्स :GSTजीएसटी