नायगाव बाजार : पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला़ ही घटना मंगळवारी घडली़तालुक्यातील इकळीमोर येथील सुनील बामण पांचाळ हा विद्यार्थी नायगावच्या दत्त विद्यालयात ११ वी वर्गात शिकत होता़ २३ सप्टेंबर रोजी सकाळी शाळेला सायकलने येत असताना तहान लागल्याने गावाच्या काही अंतरावर असलेल्या रस्त्याच्या शेजारील पठाण यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला़ पाणी पीत असताना तोल गेल्याने तो पाण्यात पडला़ पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला़ या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली़ अधिक तपास सपोनि संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी वाघमारे करीत आहेत़ (वार्ताहर)
विहिरीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: September 24, 2014 00:16 IST