परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी शेततळे घेतले आहेत, ते अस्तरीकरणासाठी प्लास्टिक पन्नीसाठी अनुदान भेटण्याची वाट पाहत आहेत. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत हा निधी रोखून धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांत पोखरा योजनेत निधी देण्यासाठी अचारसंहिता लागू नाही. मग औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची अडवणूक का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन अस्तरीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो काॅप्शन : लाडसावंगी जवळील अंजडोह येथील शेततळे प्लास्टिक पन्नी अभावी शोभेची वस्तू बनले आहे.