बीड : संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरच्या वाटेवर आहे. शुक्रवारी पालखीचे बीडमध्ये आगमन झाले होते. शुक्रवार व शनिवारी मुक्काम करून रविवारी पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. दरम्यान, पालखी दर्शनासाठी शहरातील भाविकांनी रीघ लावली होती.येथील किसनराव जाधव सेवाभावी संस्था व जिजाऊ प्रतिष्ठाणच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. उद्घाटन प्रसंगी डॉ. अजित जाधव, डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. जाजू, डॉ. बांगर, आयोजक संतोष जाधव, जयदीप सवाई, देविसिंह शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी वारकऱ्यांची तपासणी केली. यंदाचे पालखीचे ३०९ वर्ष आहे. यदांच्या पालखीत १२०० वारकरी सहभागी झाले असून त्यात सातशे महिला, दोनशे टाळकरी व झेंडेकरी सहभागी झाले आहेत. मुक्ताईनगर, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, अंबडमार्गे पाखली गुरुवारी नामलगाव येथे आली. माळीवेस भागातील हनुमान मंदीरामध्ये पालखी थांबली असता रात्री भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कबाड गल्ली येथे मराठा पंच मंडळ व आदर्श मित्र मंडळाच्यावतीने वारकऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था केली होती.(प्रतिनिधी)
मुक्ताबार्इंच्या पालखी दर्शनासाठी गर्दी
By admin | Updated: July 3, 2016 00:37 IST