शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बसची हुलकावणी; वऱ्हाडाचा टेम्पो उलटला

By admin | Updated: April 17, 2016 01:34 IST

वैजापूर : एसटी महामंडळाच्या भरधाव बसने औरंगाबादकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो उलटल्याने ३५ वऱ्हाडी जखमी झाले.

वैजापूर : एसटी महामंडळाच्या भरधाव बसने औरंगाबादकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो उलटल्याने ३५ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैजापूर- गंगापूर मार्गावरील महालगाव परिसरात चौदा मैल येथे घडली. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगाराची बस (क्र. एमएच-२० बीटी-२४६०) गंगापूरहून वैजापूरकडे येत होती, तर वऱ्हाडी मंडळींचा टेम्पो औरंगाबाद येथे शिवसेनेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जात होता. महालगावजवळील चौदा मैल परिसरात बसने हुलकावणी दिल्याने टेम्पोचालक भाऊसाहेब नंदू नेहे यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो जागेवरच उलटला. या टेम्पोमध्ये ५५ वऱ्हाडी प्रवास करीत होते. त्यामधून ९ जण गंभीर, तर २६ जण जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये उमेश विजयनाथ आल्हाट (२०), दादा रुंजा आल्हाट (५०), बाळू कुंडलिक आल्हाट (२६), अमोल ताराचंद बागूल (१६), नीलेश संजय आल्हाट (२६), सागर गोरख आल्हाट (२०), आकाश काशीनाथ गायकवाड (१८), सुनील लक्ष्मण आल्हाट (४४) यांचा समावेश आहे. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या विकास भागीनाथ जाधव, वाल्मीक विठ्ठल जाधव, सीताराम दादासाहेब गायकवाड, सिद्धार्थ देवीदास आल्हाट, गौतम भीमराज गायकवाड, सकूबाई काकासाहेब आल्हाट, कैलास कडू बनकर, मारुती तुळशीराम जाधव, नामदेव खंडू गायकवाड, जया काकासाहेब आल्हाट आणि अन्य जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गंगापूरचे एसटी आगारप्रमुख कमलेश भारती, वैजापूरचे आगारप्रमुख राजपूत तसेच वीरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.