शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कृषी विभागाच्या कारभारामुळे जलयुक्तचा बोजवारा

By admin | Updated: March 22, 2017 00:39 IST

अंबड : तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत लाखो रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी किती वाढली हा संशोधनाचा विषय आहे.

अंबड : जलयुक्त शिवार योजनेचा मुख्य उद्देश शिवारातील पडलेले पावसाचे पाणी अडवून शेत जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ करणे आहे. अंबड तालुका कृषी कार्यालयाच्या मार्फत लाखो रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे त्या-त्या गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी किती वाढली हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे.तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालया मार्फत १९ गावांमध्ये १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपयांची एकूण ७२ कामे करण्यात आली. विशेष आश्चर्यचकीत करणारा योगायोग म्हणजे यापैकी एकाही कामाने ३ लाख रुपये खर्चाची मर्यादा ओलांडली नाही.तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या एकाही कामाने ३ लाख रुपये खर्चाची मर्यादा न ओलांडल्याने इर्- निविदेच्या किचकट प्रक्रियेपासून सर्वांची आपोआपच सुटका झाली.तालुका कृषी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार योजनेतंर्गत तालुक्यातील सारंगपुर येथे १८ लाख ४४ हजार ०३४ रुपये खर्चाचे ८ कामे, सौंदलगाव येथे १२ लाख ८४ हजार १५७ रुपये खर्चाचे ५ कामे, दोदडगांव येथे ३ लाख ८९ हजार १९८ हजार रुपये खर्चाचे २ कामे, लखमापुरी येथे १४ लाख ६ हजार २३१ रुपये खर्चाचे ५ कामे, जामखेड येथे १५ लाख ३७ हजार ८२८ रुपये खर्चाचे ६ कामे, पिंपरखेड येथे ४ लाख ९० हजार ७०६ रुपये खर्चाचे २ कामे, आंतरवाला आवा येथे ४ लाख ८ हजार ९२७ रुपये खर्चाचे २ कामे, रोहिलागड येथे ११ लाख ६१ हजार ६०९ रुपये खर्चाचे ५ कामे, कुक्कडगाव येथे ४७ लाख १८ हजार ९५ रुपये खर्चाचे ८ कामे, धाकलगाव येथे ९ लाख ५ हजार ७९० रुपये खर्चाचे ४ कामे, लेंभेवाडी येथे ५ लाख ६४ हजार ८२३ रुपये खर्चाचे २ कामे, भोकरवाडी येथे ५ लाख ६८ हजार १३ रुपये खर्चाचे २ कामे, भालगांव येथे २ लाख ४९ हजार ८८० रुपये खर्चाचे १ काम, पारनेर येथे १३ लाख ४६ हजार १२७ रुपये खर्चाचे ५ कामे, दहीपुरी येथे १० लाख ७७ हजार ३३० रुपये खर्चाचे ५ कामे, बनगांव येथे ७ लाख ६५ हजार ९२१ रुपये खर्चाचे ३ कामे, दहीगव्हाण येथे ५ लाख १९ हजार ४०० रुपये खर्चाचे २ कामे, निहालसिंगवाडी येथे ८ लाख २० हजार २०० रूपये खर्चाचे ३ कामे, भाटखेडा येथे ४ लाख ५ हजार ४४३ रुपये खर्चाचे २ कामे अशा प्रकारे १९ गावांमध्ये १ कोटी ७९ लाख ९९ हजार ६१० रुपये खर्चाचे एकुण ७२ कामे करण्यात आली आहेत.