शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे माठही कोरडे

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून

अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून माठ खरेदीकडे सर्वसामान्य धजावत नाहीत़ कारण माठातील पाणी जिरपते आणि यंदा तर पिण्यासाठी विकतचे घ्यावे लागत असल्याने हे परवडेनासे झाले आहे़उन्हाची चाहूल लागली की, गोरगरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मोठी मागणी असते़ माठातील पाणी पिल्यानंतर तहान शमते़ परंतु, यंदा दुष्काळामुळे पिण्यासही पाणी मिळेनासे झाले आहे़ उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे़ त्यामुळे जलस्त्रोत आटत आहेत़ अहमदपूर शहराला तर सध्या जवळपास २५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नळाला आलेले पाण्याचा काटकसरीने वापर सुरु आहे़ शहरातील सर्व भागांना नळाचे पाणी येत नाही़ त्यातही २५ दिवसांतून एकदा आलेले पाणी पुरेसे ठरत नाही़ त्यामुळे नळाच्या पाण्याचा सुरुवातीचे चार दिवस पिण्यासाठी उपयोग करुन त्यानंतर विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे़ विकतच्या पाण्यास मागणी वाढल्याने विक्रेत्यांनीही आपले दर वाढविले आहेत़ त्यामुळे एका जारला सध्या जवळपास ३० रुपये मोजावे लागतात़ जारचे पाणी केवळ पिण्यासाठी अत्यंत काटकसरीने वापरले जात आहे़माठातील पाणी जिरपते़ त्यामुळे जारचे पाणी माठात टाकल्यानंतर कमी होते़ परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना माठातील पाणी पिणे परवडेनासे झाले आहे़ त्यापेक्षा ठराविक रक्कम अनामत ठेऊन नवीन पध्दतीच्या प्लास्टिकच्या जारचे सीलबंद पाणी मिळत आहे़ या प्लास्टिकच्या जारमधील पाणी दिवसातील काही तास थंड रहाते़ त्यामुळे ते सध्या सर्वांना परवडणारे वाटत आहे़ परिणामी, याच जारचा उपयोग केला जात आहे़ त्यामुळे माठांना मागणी कमी झाली आहे़