शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

५० लाखांच्या क्रीडा साहित्यांवर धूळ

By admin | Updated: February 4, 2015 00:42 IST

येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडूंना खेळण्यासाठी आलेले ५० लाखांचे क्रीडा साहित्य मागील काही महिन्यांपासून धुळखात पडून आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडूंना खेळण्यासाठी आलेले ५० लाखांचे क्रीडा साहित्य मागील काही महिन्यांपासून धुळखात पडून आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व नियोजनाचा अभाव असल्यामुळे याची दुरवस्था झाली आहे. क्रीडा कार्यालयाचे असेच धोरण असेल तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू कसे निर्माण होणार? असा प्रश्न उपस्थित होत असून खेळाडूंच्या भावनेशी ‘खेळ’ खेळला जात आहे. मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगमधून हे भयान वास्तव समोर आले.महाराष्ट्रातील खेळाडू आशियाई, जागतिक स्तरावर चमकविण्याच्या दृष्टीने योग्य त्या क्रीडा सुविधा गावोगावी करून देणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी गुंतवणूकदार, कॉर्पारेट बॉडीज, खाजगी कंपन्या यांच्यासह आवश्यक त्या व्यक्तींना यामध्ये सामावून घ्यावे, तसेच तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकूल कसे असावे, त्यात खेळाडूंना कोणत्या दर्जाच्या सुविधा द्याव्यात, यासंदर्भात प्रत्येक क्रीडा कार्यालयाला सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाचे परीपत्रक आहे. मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात अशी कुठलीच सुविधा दिली जात नाही. लाखो रूपयाचे साहित्य केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि योग्य नियोजन नसल्यामुळे कार्यालयाच्या विविध भागात धुळखात, अस्तव्यस्त पडलेले असल्याचे स्टींगमधून समोर आले.जिल्हा क्रीडा कार्यालयाने खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असा शासन अध्यादेश आहे. मात्र येथील परिस्थिती पाहिली तर कोणी सुद्धा म्हणनार नाही की हे जिल्हा क्रीडा कार्यालय असेल म्हणून. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळेच आज चांगले खेळाडू घडत नाहीत, असा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला जात आहे. चार ठिकाणी चार साहित्यखेळाडूंसाठी आलेले साहित्य हे चार ठिकाणी पडलेले आहे. विशेष म्हणजे काही साहित्य तर नवे असून देखील त्याची योग्य ठिकाणी ठेवण्याची सोय केलेली नाही. गाद्या पायऱ्यावर पडलेल्या आहेत, तर खोलीतील साहित्याची केवळ थपी लागलेली आहे.साहित्याचा होईना उपयोगक्रीडा संचालनालयाकडून क्रीडा साहित्य दिले जाते, मात्र त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. इतर ठिकाणी साहित्याची मागणी होत असते मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालय याला अपवाद आहे. येथे साहित्य उपलब्ध असुनसुद्धा ते मिळत नसल्याची खेळाडंूची ओरड आहे.५० लाखांत या साहित्यांचा अभिप्रायअ‍ॅथेलेटिक्स सर्व साहित्य जिम्नॅस्टिक , मल्लखांब, बॉक्सींग रिंग, कुस्ती, ज्यूदो, तायक्वांदो व जिम्नॅस्टिक्स मॅटस, लॉन टेनिस, तलवार बाजी, शूटिंग रेंज व एअर वेपन तसेच अन्य साहित्य, टेबल टेनिस, बिलियर्डस व स्नूकर, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी हालविण्याजोगे साहित्य, इनडोअर गेमचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, असाही शासन नियम आहे.