शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकाने तीन वाहनांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:09 IST

औरंगाबाद : बळिराम पाटील चौक परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने एका दुचाकीसह दोन वाहनांना उडविले. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या ...

औरंगाबाद : बळिराम पाटील चौक परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने एका दुचाकीसह दोन वाहनांना उडविले. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या दोनजणांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमीतील एकाची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.

बळिराम पाटील चौकातून जाताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एम.एच. २०, एफ.जी. २४४९) एका वाहनाला उडविले. त्यानंतर दुचाकीला जोराची धडक दिली. दोन वाहने उडविल्यानंतर तिसऱ्या गाडीला धडक दिली आहे. या धडक देणाऱ्या कारमध्ये सुमित कैलाश केदार (वय ३२, रा. जाधववाडी) आणि रूपेश सखाराम आपत (३७, रा. नागसेननगर, टी.व्ही. सेंटर) हे दोघे आढळून आले. त्यातील एकजण मद्य जास्त प्राशन केल्यामुळे गाडीतच झोपून होता. दुसऱ्या चालकाला पोलिसांनी पकडून वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन गेले असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.

चौकट,

सिडको उड्डाणपुलाच्या कठड्यावर कारची धडक

सेव्हल हिलकडून सिडकोकडे जात असलेल्या एका कारने (एम.एच.२०, डी.जे. ३८७२) उड्डाणपूल सुरू होत असताना असलेल्या डिव्हायडवर जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की, गाडी तीन वेळा उलटली. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला. त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.