विल्सन विल्यम रेड्डी (रा. सिडको एन ६) असे आरोपीचे नाव आहेत. शल्यचिकित्सा शास्त्र विभागात कार्यरत निवासी डॉक्टर तरुणी रविवारी रात्री नऊ वाजता कामावर जात होती. यावेळी आरोपी त्यांच्या अडवा झाला आणि तुम्ही आणि तुमचे डॉक्टर माझा मित्र प्रतीकच्या नातेवाइकांवर चांगले उपचार करीत नाही म्हणून तो शिवीगाळ करू लागला. यानंतर त्याने त्यांच्यासोबत झटापट करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी आरडाओरड केल्यावर प्रत्यक्षदर्शींनी त्याला पकडले आणि चोप दिला. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो त्यांनाही शिवीगाळ करू लागला. त्याला पोलीस चौकीत नेण्यात आले. त्याला मुक्का मार लागल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी सुरक्षारक्षक गौरव संजय सोळुंके यांनी बेगमपुरा ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद नोंदविली.
मद्यपीची निवासी डॉक्टर तरुणीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:04 IST