शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

औषधींचा साठा रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:12 IST

पिशोर -औरंगाबाद रस्त्यालगत असलेल्या गौरपिंप्री खांडीत रविवारी चालू स्थितीतील सरकारी औषधींचा फेकलेला साठा आढळून आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार अजून एकदा समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : पिशोर -औरंगाबाद रस्त्यालगत असलेल्या गौरपिंप्री खांडीत रविवारी चालू स्थितीतील सरकारी औषधींचा फेकलेला साठा आढळून आल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार अजून एकदा समोर आला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे याच खांडीत गेल्यावर्षी सुद्धा अशीच औषधी फेकण्यात आली होती. मात्र ती कालबाह्य होती. परंतु आता चक्क मुदतीत असलेली औषधी फेकण्यात आल्याने त्या घटनेशी काही साधर्म्य आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे.गौरपिंप्री शिवारात वनविभागाच्या हद्दीत औरंगाबाद रस्त्यापासून ५० फूट आत झुडपामध्ये औषधींची अनेक पाकीट अस्ताव्यस्त पडलेली नागरिकांना दिसून आली. जवळ जाऊन पाहिले असता लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या जून २०१८ रोजी कालबाह्य होणाºया औषधी असल्याचे दिसून आले.शनिवारी दुपारी जवळपास शंभरच्या आसपास ही पाकिटे आढळून आली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी पट्टे जाळल्याने यातील काही पाकिटे ही जळून गेली आहेत.एकीकडे अनेक शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा असून ही औषधी कुणी व का फेकली याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे गौरपिंप्री येथील माजी सरपंच विजय सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, पद्मसिंग सूर्यवंशी, अरुण सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, सुरेश चौथमल, रणजीत सूर्यवंशी यांनी सांगितले.आरोग्य अधिकारी म्हणतात... चौकशी करूया औषधी साठ्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी अनिल विडेकर यांनी सांगितले की, सदरील औषधी साठ्याच्या बॅच नंबरवरुन चौकशी करुन संबंधितास कारणे दाखवा नोटिस देण्यात येईल. तर पिशोर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले की, गर्भवती महिला व रक्तकमी असणाºया रुग्णांना वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत काही महिन्यांपूर्वी या गोळ्या वाटप करण्यात आल्या होत्या. आता त्या कुणी व का फेकल्या हे बॅच नंबरवरुन कळेल.४सदरील ठिकाण हे नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून तेथील आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शेवगण यांना या साठ्याबाबत विचारणा करण्यात आली असून किती साठा मिळाला, किती वाटप झाला व किती शिल्लक आहे याची माहिती देण्यास सांगण्यात आले असल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी अनिल विडेकर यांनी सांगितले.