शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती

By admin | Updated: June 29, 2017 00:14 IST

परभणी : ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़

त्र्यंबक वडसकर । लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था व आपले अज्ञान यातून अस्वस्थता जाणवत होती़ माझ्या फार्मसी व्यवसायात येणाऱ्या ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘औषध’ या लघुपटाचे दिग्दर्शक अमोल देशमुख हे परभणी येथे ‘चित्रपट रसास्वाद’ या कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या़ ‘औषध’ या लघुपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, एका म्हातारीला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या, ही गोष्ट रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर त्या म्हातारीच्या घराचा शोध घेत मानवी नातेसंबंधावर प्रकाश टाकत औषधी क्षेत्रातील जबाबदारी या लघुपटातून ठळक केली आहे़ या क्षेत्राकडे कसे वळलात? असे विचारले असता, त्यांनी सांगितले, लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमाची व नाटक करण्याची आवड होती़ पुढे फार्मसीच्या व्यवसायात स्थिर झाल्यानंतर माझ्यातील कलावंत शांत बसू देत नव्हता़ त्यातून आरबाड फिल्म क्लब पुणे यांच्या पहिल्या वर्कशॉपचा मी पहिला विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण घेतले़ प्रसिद्ध दिग्दर्शक समर नखाते, उमेश कुलकर्णी व संकलन रिमा कौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले़ या १५ वर्षात डिजीटल क्रांती झाली असून, पूर्वी शहरातच असलेला कॅमेरा आता घराघरात जावून पोहचला आहे़ ग्रामीण भागातील लोकांची अनुभव संपन्नता खूप मोठी आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी घाई न करता अगोदर तांत्रिक प्रशिक्षण घेऊनच यावे, असेही देशमुख यांनी सांगितले़