शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘हाफकीन’मार्फत औषध खरेदी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:59 IST

राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. त्यातून त्यांच्या अखत्यारीतील दवाखान्यांसाठीची औषध खरेदी शासनाच्या ‘हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि.’मार्फत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे, असे निवेदन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गुरुवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या खंडपीठात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. त्यातून त्यांच्या अखत्यारीतील दवाखान्यांसाठीची औषध खरेदी शासनाच्या ‘हाफकीन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि.’मार्फत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे, असे निवेदन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गुरुवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्या खंडपीठात केले.त्याअनुषंगाने महाधिवक्ता कुंभकोणी यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. केवळ राज्य शासनाच्या अधीनस्थ विभागांनीच नव्हे तर महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गतच्या दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा असतो. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने होणा-या खरेदीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गतच्या दवाखान्यांचाही अंतर्भाव करावा.जेणेकरून त्यांनाही माफक दराने चांगल्या दर्जाची औषधी मिळेल, असे निवेदन अ‍ॅड. पालोदकर यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने केले. आजच्या सुनावणीदरम्यान केंद्र शासन आणि आरोग्य सेवा विभागाचे संचालक यांच्या वतीने खंडपीठात शपथपत्र सादर करण्यात आले. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत झालेल्या औषधी खरेदी गैरव्यवहारात राज्य शासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग जबाबदार नसून, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील अधिकाºयांना अनुभव नसल्याने अनियमितता झाल्याचे यापूर्वीच सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले होते.केंद्र शासन राज्य शासनाला निधी पुरविते. खरेदी प्रक्रिया आदी राज्य शासनामार्फत राबविली जाते, असे म्हणणे मांडले. याचिकेवर २६ मार्च रोजी सुनावणी होईल. केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे, तर राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी आणि न्यायालयाचे मित्र म्हणून देवदत्त पालकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे काम पाहिले.