शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट...!

By admin | Updated: July 9, 2017 00:34 IST

जालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणी धोक्यात आली आहे. परिणामी गत वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा दुष्काळ पडला तर, या विचाराने घालमेल सुरू आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. पैकी सात जुलैअखेर तीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाच्या २९७९.९२ पैकी २३०४.६४ हेक्टरक्षेत्रावर लागवड झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली असून, पीक तीन ते चार पानावर वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकात आंतर मशागत कोळपणी, खुरपणीची कामे पूर्ण झाली आहे. खताची पहिली मात्रा देण्यात आली असून, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. परंतु आता पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तुरीच्या ४८७.०७ हेक्टर क्षेत्रापैकी ४०७.५ हेक्टवर पेरणी झाली आहे. उडीद व मूग पिकाची अनुक्रमे ४६.३ व ६७.३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाजरी व मका पिकांची अनुक्रमे २१२.०१ व ३४३.०८ हेक्टवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची सर्वच पिके धोक्यात आली आहेत. खरिप पिकांसाठी पावसाची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने विभागीय स्तरावर पाठवला आहे. सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.