शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी अनुदान लाटणाऱ्यांची गय करणार नाही

By admin | Updated: July 13, 2016 00:43 IST

औरंगाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले दुष्काळी अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,

औरंगाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेले दुष्काळी अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.दुष्काळी अनुदानापासून जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यातील काही महाभागांनी ३ ते १५ वेळा अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे. शिरेसायगाव आणि गवळीशिवरा सजाचे तलाठी जे. के. सोनवणे, व्ही. व्ही. कंसार, ज्ञानेश्वर नजर यांनी लाभार्थ्यांच्या बनावट याद्या तयार करून दुष्काळी अनुदानाची खिरापत वाटली होती. विशेष शेतकरी नसणाऱ्यांची नावेही या याद्यात घुसडण्यात आली होती. काही बनावट लाभार्थी तर परजिल्ह्यातील होते. तसेच मृत व्यक्तींच्या नावानेही अनुदान लाटण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांची बँक खाती उघडून अनुदानाच्या रकमा या खात्यांमध्ये वर्ग करून घेतल्या होत्या. ‘दुष्काळातही धुतले हात’ या मथळ््याखाली ‘लोकमत’च्या १२ जुलै रोजीच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून सव्वा कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा चव्हाट्यावर आणला. या वृत्ताने खळबळ उडाली. अनुदान घोटाळ््याची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी जिल्हा प्रशासनास दिले. शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान शेतकरी नसणाऱ्या बनावट लाभार्थ्यांना वाटप करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे विभागीय आयुक्त दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनुदान लाटणारे बनावट लाभार्थी तसेच त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा करणारे महसूल आणि जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारीही तेवढेच दोषी आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या कोणाचीच गय केली जाणार नाही. जिल्हा बँकेने त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, महसूल खात्यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील लवकरच कारवाई केली जाईल, असे दांगट यांनी स्पष्ट केले.