शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात नोटांचा दुष्काळ

By admin | Updated: June 2, 2016 23:49 IST

औरंगाबाद : दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला म्हणूनच की काय, आता दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी शासनाने ३ हजार ९०० कोटी मंजूर केले खरे

औरंगाबाद : दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला म्हणूनच की काय, आता दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी शासनाने ३ हजार ९०० कोटी मंजूर केले खरे, पण एवढी मोठी रक्कम वाटण्यासाठी बँकेत नोटाच नाहीत. या चलन तुटवड्यामुळे रक्कम वाटपात विलंब होण्याची भीती मराठवाड्यातील सहकार उपनिबंधकांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर व्यक्त केली. शेतकरी दुष्काळाने ग्रासलेले असताना त्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारी रक्कम पदरी पडणे मुश्कील झाले आहे. ३ हजार ९०० कोटी रुपये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यासाठी राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि खाजगी बँकांमध्ये येणाऱ्या चलनाचा (करन्सी) तुटवडा निर्माण झाल्यामुळे सगळे व्यवहार ठप्प होण्याची भीती विभागातील सहकार क्षेत्रातून गुरुवारी व्यक्त करण्यात आली. विभागातील पीक विम्याची मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण होत असताना बँकांकडे चलन नसल्याची कैफीयत उपनिबंधकांनी राज्यमंत्री भुसे यांच्यासमक्ष मराठवाड्यातील सहकार उपनिबंधकांनी विमा रक्कम कशी वाटप करायची, असा सवाल उपस्थित केला. नोटांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. विमा मूल्यांकन झालेले आहे. परंतु बँकांमध्ये चलन नसल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत ही रक्कम जाणे अवघड आहे. याप्रकरणी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यमंत्री भुसे यांच्याकडे करण्यात आली.