शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदतीचे

By admin | Updated: September 13, 2015 00:06 IST

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़ उर्वरीत १०़५३ कोटीचा निधी, सामुहिक क्षेत्रातील वाद, बँक खाते काढण्यातील अडचणी यामुळे अद्यापही रखडला आहे़ ‘लोकमत’ हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीतून हे वास्तव समोर आले आहे़ खरीप हंगाम २०१४ मध्ये बाधीत शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने २१८़२ कोटीची आर्थिक मदत जिल्हा प्रशासनाकडे १० जुलै रोजी आली़ ही मदत लातूर जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार २६६़९० हेक्टरसाठी आली असून, यापैकी पहिल्या टप्प्यात १७५़७३ कोटींचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४२़३० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला़ त्यामुळे एकूण २१८ कोटींपैकी २०७़५० कोटीचा निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे़ परंतू, काही शेतकऱ्यांचे सामाईक क्षेत्रातील वाद, न्यायालयीन प्रकरणे, मयत शेतकरी, बाहेरगावी कामानिमित्त राहत असलेले शेतकरी यांनी बँक खातेच काढले नसल्याने उर्वरीत १०़५३ कोटींचा निधी अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे पडून राहिला आहे़ जिल्हा प्रशासनाकडे राहिलेल्या निधीची माहिती शेतकऱ्याला नसल्यामुळे सदरील शेतकरी बँकेच्या शाखेकडे चकरा मारण्यात परेशान आहेत़ परंतू त्यांना बँकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून अपेक्षीत माहिती मिळत नसल्यामुळे आशा हजारो शेतकऱ्यांचा दुष्काळी मदत निधी अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ बँकेकडे चकरा मारुन थकलेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील २१८ कोटींपैकी १०़५३ कोटींचा निधी अद्यापही रखडला असल्याचे ८ शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन समोर आले आहे़ दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली दुष्काळी मदत आपल्यासह कुटुंबीयांना मिळावी, यासाठी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते क्रमांक देऊन आपल्या खात्यावरील दुष्काळी मदत घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी केले आहे़ दुष्काळी स्थितीमुळे राज्य शासनाने अन्नसुरक्षा योेजनेतून शेतकऱ्यांना दोन रुपये दराने तांदूळ आणि तीन रुपये दराने गहू देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सातबारा घेऊन शेतकरी दुकानात जात आहेत. परंतु यादीत नाव नाही म्हणून दुकानदार परत पाठवित आहेत. पर्यार्याने हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना दुकानातून रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे धान्य मिळते, तसे धान्य शेतमजुरांना का नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या घरी किमान काहीतरी असते. परंतु ज्याच्या घरी काहीच नाही ते शेतमजूर उपाशी मरत आहेत, असे औसा तालुक्यगातील सिंदाळवाडी (टेंबी) चे सय्यद गुलाम महमंद यांनी सांगितले. ४काही गावांनी शेतकऱ्यांची वाटमारी केली जात असून गरजेपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे दूरध्वनी ‘लोकमत हेल्पलाईन’वर आले आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय सातबारा दाखविल्यावर शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे मिळते पण शेतमजुरांच्या धान्याबाबत शासन निर्णय घेणार आहे की नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून आहे. ४‘लोकमत’ने सुरु केलेल्या हेल्पलाईनवर सर्वाधिक भ्रमणध्वनी आले ते फक्त अन्नसुरक्षेतील दरानुसार अन्न मिळत नसल्याचेच. अहमदपूर तालुक्यातील हडोळती, किनगाव, लातूर तालुक्यातील गाधवड, गंगापूर, चिंचोली बु., औसा तालुक्यातील भादा, उजनी, आशिव, किल्लारी, निलंगा तालुक्यातील निटूर, अंबुलगा, शिरुर अनंतापळसह तालुक्यातील साकोळ, उदगीर शहरसह तालुक्यातील वाढवणा बु., नागलगाव तांडा, जळकोट, देवणी, रेणापूर तालुक्यातील अनेक गावांतून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़