औरंगाबाद : बस, रिक्षा यासह विविध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे क रण्याचा निर्णय जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. चारित्र्य प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडूनच शाळांनी विद्यार्थ्यांची वाहतूक केली पाहिजे, अशी सूचना पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी या बैठकीत केली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करणे आवश्यक आहे; परंतु अनेक शाळांमध्ये ती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय शाळांमध्ये समिती स्थापन केल्याची नोंदही आरटीओ कार्यालयात नसल्याचे दिसून येते. स्कूल बस असो की रिक्षा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र वेळोवेळी समोर आलेल्या घटनांमुळे ऐरणीवर येत आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात जिल्हा परिवहन समितीची बैठक पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे
By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST