शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त फौजदारांसह कारचालक ठार

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

शेंद्रा फाटा येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात निवृत्त फौजदार आणि त्यांचा कारचालक जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि दोन नातवंडे गंभीर जखमी झाले.

शेंद्रा : जालना रोडवर सतत अपघात घडत असतात. या मार्गावरील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या शेंद्रा फाटा येथे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात निवृत्त फौजदार आणि त्यांचा कारचालक जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि दोन नातवंडे गंभीर जखमी झाले. निवृत्त फौजदार भाऊराव दगडू खार्डे (६५,रा. रामनगर, जुना जालना) आणि त्यांचा कारचालक शिवाजी दिनकर शिंदे हे या भीषण अपघातात ठार झाले. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी सांगितले की, खार्डे हे त्यांची सून शारदा राजू खार्डे (३८), नात सिद्धेश्वरी (१५)आणि नातू प्रथमेश (१२) यांच्यासह मंगळवारी रात्री कारने (क्रमांक एमएच-२१ एएक्स १९१) जालना येथून औरंगाबादकडे येत होते. वेगात जाणारी ही कार शेंद्रा फाट्याजवळ आली असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या कारच्या चालकाने (क्रमांक एमएच-२० डीजे ७८०६) शेंद्रा गावाच्या दिशेने दुभाजक ओलांडले. यावेळी वेगात असलेल्या दोन्ही कार अचानक समोरासमोर आल्याने त्यांच्यात भीषण टक्कर झाली. भाऊराव खार्डे आणि कारचालक शिवाजी शिंदे हे जागीच ठार झाले. तर त्यांची सून आणि नातू, नात हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच दुसरा कारचालक आणि अन्य प्रवासी कार सोडून घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे या घटनेत त्यांना मार लागला अथवा नाही, याबाबतची माहिती समजू शकली नाही. अपघात घडताच जालना रोडवरून जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवली आणि पोलिसांना कळवले.