शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

"बार ऑन व्हील" चा चालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:44 IST

जालना रोडवरील एका हॉटेलमधील ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मद्य विक्री करणा-यास हॉटेलचालकास चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद: महामार्गावरील मद्यालये  बंद झाल्याने मद्यपींची चांगलीच गोची झाली आहे. मद्य तस्करांना मात्र यामुळे पैसे कमविण्याची ही एक संधीच मिळाली. जालना रोडवरील एका हॉटेलमधील ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मद्य विक्री करणा-यास हॉटेलचालकास चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. " बार ऑन व्हील " असलेल्या कारमध्ये लपवून ठेवलेला ५ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा आणि १ लाख ९० हजाराची कार पोलिसांनी जप्त केली.

शशांक वैजीनाथ कदम (३१,रा. बीड बायपास परिसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले म्हणाले की, जालना रोडवरील हॉटेल लोकसेवा येथे ग्राहकांना अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यानंतर आम्ही दोन पंटर ग्राहक हॉटेलवर पाठवून त्यांना मद्य मागण्याचे सांगितले असता आरोपी शशांक हा हॉटेलच्या काऊंटरवर बसलेला होता. यावेळी त्याने विदेशी मद्याची बाटली त्याच्या कारमधून (क्रमांक एमएच-२१ -२१९२)आणून दिली. 
 
यानंतर पोलिसांनी त्यास पकडले आणि हॉटेलची झडती घेतली असता तेथे विदेशी मद्याच्या १२ बाटल्या मिळाल्या. यासोबतच हॉटेलच्या परिसरात उभ्या कारची झडती घेतली असता कारमध्येही दारूच्या आणखी ८ बाटल्या मिळाल्या. हा दारूसाठा आणि " बार ऑन व्हील" असलेली कार पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीविरूद्ध चिकलठाणा ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक  संदीप सोळंके आणि कर्मच-यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.