शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचनाला लागली गळती

By admin | Updated: August 31, 2014 00:11 IST

दगडू सोमाणी, गंगाखेड अनुदान प्राप्त होण्यासाठी असलेली वेबसाईट बंद असल्याने शासनाकडे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान थकित राहिले असून, ठिबक सिंचन योजनेला गळती लागली आहे.

दगडू सोमाणी, गंगाखेडएक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सूक्ष्म सिंचन अनुदान प्राप्त होण्यासाठी असलेली वेबसाईट बंद असल्याने शासनाकडे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान थकित राहिले असून, ठिबक सिंचन योजनेला गळती लागली आहे. महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनासाठी ६० टक्के अनुदान जाहीर केले आहे. पाण्याची बचत व पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शासनाने ही योजना अंमलात आणली. या योजनेमधील शेतकऱ्यांनी १०० टक्के रक्कम भरून ठिबक किंवा तुषार सिंचन अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा लागतो. चांगल्या कंपनीच्या ठिबक सिंचनासाठी १ हेक्टरला १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यामध्ये ६० टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान स्वरुपात एक महिन्याच्या आत जमा करण्याचे शासनाने जाहीर केले होते. जुलै २०१३ पासून आजपर्यंत शासनाने ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजना राबविली, त्याचे अनुदान अद्यापपावेतो वितरित केले नाही. सूक्ष्म सिंचन अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध नमुन्याचे कागदपत्रे जमा करावे लागतात. अनेक कार्यालयात खेटे घालून प्राप्त केलेले दस्तावेज वेबसाईटद्वारे शासनाकडे पाठविली जातात. त्यानंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यावर जमा केले जाते. वर्ष २०१३-१४ मध्ये जुलै १३ पासून आज तेरा महिन्यांपर्यंत परभणी जिल्ह्यातील चार ते पाच हजार शेतकरी अनुदान रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाची अनुदान मिळवून देणारी वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांची कोट्यवधी रकमेची गुंतवणूक अडकून पडली आहे, अनुदान केव्हा मिळते या आशाळभूत नजरेने शेतकरी शासनाची वेबसाईट उघडण्याची वाट पाहत आहेत. पावसाळा संपत आला मात्र भविष्यात पाणीटंचाई भासणार असल्याने शासनाने पाणी बचतीसाठी राबविलेली ठिबक सिंचन योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. शासनाची वेबसाईट वर्षभर चालू राहिली तरच ठिबक सिंचनाकडे शेतकरी आकर्षित होतील, अन्यथा भविष्यात ठिबक सिंचनाला गळती लागल्याशिवाय राहणार नाही.