शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘पेयजल’वर संक्रांत !

By admin | Updated: January 14, 2017 00:22 IST

बीड प्रशासकीय अनास्था व दफ्तरदिरंगाईमुळे जिल्ह्यातील ६४ गावांत प्रस्तावित मुख्यमंत्री पेयजल योजनांची अंमलबजावणी मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे

संजय तिपाले  बीडप्रशासकीय अनास्था व दफ्तरदिरंगाईमुळे जिल्ह्यातील ६४ गावांत प्रस्तावित मुख्यमंत्री पेयजल योजनांची अंमलबजावणी मागील आठ महिन्यांपासून रखडली आहे. आता जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजल्याने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्या आहेत. परिणामी या योजनांवर ‘संक्रांत’ ओढावली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. पूर्वी योजना न झालेल्या गावांना यात प्राधान्य आहे. २०१६-१७ या वर्षासाठी जिल्ह्यात ६४ गावांत ही योजना साकारण्यात येणार असून त्यासाठी लोकसंख्या व जलस्त्रोत ग्राह्य धरुन सुमारे ५९ कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, ३१ योजनांची अंदाजपत्रके ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे शासनस्तरावर गेली आहेत. उर्वरित योजनांचे अंदाजपत्रक अद्याप जिल्हास्तरावरच आहेत. सध्या सात योजनांची अंदाजपत्रके तयार असून ते औरंगाबाद येथील जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांमार्फत राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे जाणार आहेत. २१ योजनांच्या अंजाजपत्रकांचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७ योजनांचा घोळ कायम आहे. आता आचारसंहिता लागू झाल्याने आणखी ४० दिवसांपर्यंत यासंदर्भात कुठलाही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. परिणामी योजनांच्या प्रत्यक्ष अमंलबजावणीसाठी आता आणखी काही महिन्यांचा कालावधी अटळ आहे.तथापि, सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्याला टंचाईचा सामना करावा लागला होता. गतवर्षी १ हजारांहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागले होते. मुख्यमंत्री पेयजल योजनेमुळे संबंधित गावांतील जलसंकट दूर होणार आहे. त्यामुळे या योजनांची तातडीने अंमलबजावणी अपेक्षित आहे.