शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

चोरट्याने मारला दागिन्यांवर डल्ला

By admin | Updated: June 17, 2014 01:07 IST

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेचे ९० हजार रुपयांचे दागिने व रोख १,२०० रुपये ठेवलेली पर्स चोरट्याने पळविली.

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेचे ९० हजार रुपयांचे दागिने व रोख १,२०० रुपये ठेवलेली पर्स चोरट्याने पळविली. ही घटना आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात क्रांतीचौक ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कोटला कॉलनीतील शनी मंदिराजवळील विजया बँकेत लिपिक असलेल्या गायत्री श्रीनिवास चोबे (३१, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) या पैठणला जाण्यासाठी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचल्या. ९.३० वाजेच्या सुमारास पैठणकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. तेव्हा गायत्री चोबे यांनी बसमध्ये चढण्याची लगबग सुरू केली. गर्दीतून वाट काढत त्या बसमध्ये एका सीटवर बसल्या. मोबाईल काढण्यासाठी त्यांनी काखेत अडकवलेली पिशवी काढली. पिशवीत ठेवलेली पर्स शोधली असता ती पिशवीत नव्हती. बसमध्ये चढण्यापूर्वी ती पर्स पिशवीत होती आणि ती सापडत नसल्यामुळे गायत्री चोबे घाबरून गेल्या. त्यांनी बसखाली उतरून थेट क्रांतीचौक ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास जमादार नाना पठारे करीत आहेत.पोलीस चौकी कुचकामीमध्यवर्ती बसस्थानकात असलेली पोलीस चौकी कुचकामी ठरली आहे. अनेकदा चौकीत पोलीस आहेत की नाही, याबाबत प्रवासी संभ्रमात असतात. काय गेले चोरीलागायत्री चोबे यांनी गर्दीत बसमध्ये चढणे अवघड होईल, म्हणून काखेत निळ्या रंगाची पिशवी अडकवली. त्या पिशवीत पर्स ठेवली. पर्समध्ये ५ हजार रुपयांचा मोबाईल१,२०० रुपयांची रोकड३० हजार रुपये किमतीचे गंठण२० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ बांगड्या१० हजार रुपये किमतीचे कानातील २ टॉप्स१० हजार रुपये किमतीच्या ३ अंगठ्या१० हजार रुपये किमतीची चेन१० हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, असा ऐवज होता. ती पर्सच चोरट्याने पळवली.