मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी संकल्प शुक्ला होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा फेम डॉ. सुधीर निकम, दिग्दर्शक गोरख जोगदंड, टीव्ही सिरियलचे कॅमेरामन राजेश नडोने, नेहरू युवा केंद्राच्या सांगली जिल्हा युवा अधिकारी अरुणा कोचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भदंत बोधिपालो यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डाॅ. चारुशिला लोखंडे, ताराबाई गायकवाड, रेखा क्षीरसागर, चित्रा झिरपे, संगीता कदम, दीपाली फडतरे, शिल्पा कुलकर्णी, डाॅ. सुधीर निकम, डाॅ. विवेक गायकवाड, प्रदीप शिवपूजे, प्रकाश तांबीतकर, गणपत कांबळे, डाॅ. प्रशांत होर्शील, ॲड. संजय घोगरे, मिलन गायकवाड, अजय देहाडे, श्यामसुंदर भालेराव, गणेश चंदनशिवे, रवी डोंगरे, रमेश भालेराव, दिलीप वाघ, गोरख जगधने, जीवन मोहिते, सुनील जाधव, आनंद रोकडे, डाॅ. संतोष चौहान, साबील शेख, संजय बनसोडे, साबेर शेख, किरण यादव, वाजीद अली, सोनल रंगारी, डॉ. हरी कोकरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नितीन सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, विशाखा रुपल नांदगावकर यांनी सूत्रसंचालन तर अरुणकुमार पाईकडे यांनी आभार प्रदर्शन केले. यशस्वितेसाठी सुंदर साळवे, आनंद कस्तुरे, संजय मिसाळ, सचिन वाघुले, प्रकाश कांबळे, विनायक मगरे, कैलास दाभाडे यांनी प्रयत्न केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श राज्य पुरस्कार मान्यवरांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:03 IST