शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड ठाण्यासमोर नातेवाईकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:55 IST

केळगाव येथील ग्रामपंचायत शिपायाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण तापतच चालले असून या प्रकरणी सोमवारी दिवसभर ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईक व काही पुढाºयांनी ठिय्या आंदोलन करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायत शिपायाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण तापतच चालले असून या प्रकरणी सोमवारी दिवसभर ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईक व काही पुढाºयांनी ठिय्या आंदोलन करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, मयत ग्रा.पं. शिपाई विठ्ठल वाघ यांचा मृतदेह सोमवारी रात्रीपर्यंत सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पडून होता.दुपारपर्यंत नरमलेले पोलीस कलम ३०६ व अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यास तयार होते, पण खुनाचा गुन्हा दाखल करा तरच प्रेत ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने आता अर्ज द्या, चौकशी करुन नंतर गुन्हे दाखल करू,अशी भूमिका उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी घेतली.सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे पती व इतर चार जणांनी संगनमत करुन वाघ यांचा खून केल्याचा आरोप मयताचा मुलगा व मुलगी यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व आ. अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र, नातेवाईक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलीस प्रशासन पेचामध्ये सापडले आहे. रात्री उशिरापर्यंत तडजोडीचे प्रयत्न सुरू होते.