फाउंडेशनच्या वतीने ‘उत्थान’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करण्यात येत आहे. गुरूवारी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी दिनकर काळे यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून धवल क्रांती संस्थेतर्फे ५२ पुस्तके व दोन आलमारी, संगणक, टेबल-खुर्च्या देण्यात आल्या. फाउंडेशनने भग्नावस्थेमध्ये असलेल्या इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटी केली व पुस्तकांसाठी रॅक दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सनदी अधिकारी अनमोल सागर, डॉ. अरविंद गायकवाड, आर. डी. महाजन, माधव बोर्डे, डॉ. प्रियानंद आगळे, दौलत खरात, सिद्धार्थनगर सातवाहन बुद्धविहार समितीचे अध्यक्ष रमेश मगरे, प्रशांत दंदे, भारत शिंदे, डॉ. किशोर उडाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास भिसे यांनी केले. राहुल सरवदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित बोर्डे, किरण रगडे, सतीश दाभाडे, विजय मगरे, गोविंद चंदनशिवे, नंदू दाभाडे, प्रितेश गायकवाड, आकाश दाभाडे आदींंनी परिश्रम घेतले.
कॅप्शन :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनमोल सागर, डॉ. अरविंद गायकवाड, दिनकर काळे, आर. डी. महाजन, माधव बोर्डे, डॉ. प्रियानंद आगळे, दौलत खरात आदी.