राजूर : सोमवारी झालेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वर संस्थानला गणेशभक्तांकडून ३ लाख ५२ हजार ८३५ रूपये देणगी मिळाल्याची माहिती गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे प्रभारी तहसीलदार श्रीरंग डोळस यांनी मंगळवारी दिली.वाहन पार्कींग १० हजार ६२० रूपये, प्रवेश देणगी ८१ हजार ९०० रूपये, अभिषेक देणगी २९ हजार ८९६ रूपये, बांधकाम देणगी ३६ हजार ९०९ रूपये, सुबक मार्बल आसन देणगी २० हजार ४० रूपये, गुरव दानपेटी एक लाख ३५ हजार ३५० रूपये, बांधकाम दानपेटी ३८ हजार १२० रूपये अशी एकूण ३ लाख ५२ हजार ८३५ रूपये देणगी मिळाली. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी राजुरेश्वर मंदिरात देणगी पेट्या उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले. यावेळी सरपंच शिवाजी पुंगळे, विश्वस्त श्रीरामभाऊ पुंगळे, तलाठी आर.पी.खंडागळे, श्रीरामपंच पुंगळे, व्यवस्थापक गणेशराव साबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ थोटे, अशोक कापरे, देविदास साबळे, मनोज साबळे, गजू वाघ, संजय टेपले, बाळा तांगळे, भीमराव बारवकर, कांता डवले यांच्यासह भाविक, संस्थान व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
राजुरेश्वराच्या चरणी साडेतीन लाखांची देणगी
By admin | Updated: August 5, 2015 00:33 IST