शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पतीने केला कुुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:05 IST

फुलंब्री : घरात होणाऱ्या सततच्या अंतर्गत वादातून संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गिरसावळी ...

फुलंब्री : घरात होणाऱ्या सततच्या अंतर्गत वादातून संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गिरसावळी गावात बुधवारी सायंका‌ळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून वडील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर (५२) याच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गिरसावळी येथील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर व पत्नी विमलबाई गाडेकर (५२) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद होत असे. त्यामुळे तो औरंगाबाद शहरात एकटाच राहत होता. लॉकडाऊन लागल्यामुळे चार महिन्यांपासून ज्ञानेश्वर गाडेकर हा चार महिन्यांपासून गावाकडे येऊन शेतात छप्पर टाकून एकटाच राहत होता. स्वयंपाक देखील स्वत:च करीत होता. बुधवारी ज्ञानेश्वर गाडेकर हा शेतातून सायंकाळच्या वेळेला कुऱ्हाड घेऊन गावात आला. घरी गेल्यावर पत्नीशी वाद घालून त्याने तिच्या छाती, पोटात व पाठीवर कुऱ्हाडीने वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्याने घटनास्थळावरून पळ‌ काढला.

काही वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शेतशिवारात असलेल्या त्याच्या मुलाला देखील माहिती मिळाली. मुलाने घराकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला घेऊन त्याने ग्रामीण रुग्णालयात गाठले. डॉक्टरांनी विमलबाई गाडेकर यांना मृत घोषित केले. मुलगा शिवनाथ गाडेकर (२३) याने रात्री उशिरा फुलंब्री पोलीस ठाणे गाठून वडील ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे करीत आहेत.

----

वादाचा शेवट झाला खुनानेच

ज्ञानेश्वर गाडेकर याला दोन मुली व दोन मुले आहेत. यातील दोन मुली व एका मुलाचे लग्न झालेले असून एक मुलगा अद्याप अविवाहित आहे ज्ञानेश्वर गाडेकर यास स्वत;च्या मालकीची चार एकर शेतजमीन आहे. त्याचे पत्नी विमलबाई गाडेकर यांच्याशी कायम वाद होते. या वादाचा शेवट अखेर त्याने खून करूनच केला.

--

फोटो :

मृत विमलबाई गाडेकर यांचा फोटो.

सूचना -- दोन फोटो