शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निबंधकांकडे कागदपत्रांची मागणी

By admin | Updated: March 11, 2017 23:53 IST

जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील काही कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. उर्वरित कागदपत्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र मिळविण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे आल्याने त्यांनी तातडीने बदनापूर येथील जेपीसी बँकेतील कागदपत्रांची पडताळणी केली. परंतु संबंधित प्रकरणांची कागदपत्रे येथे आढळून आली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संबंधी जालन्यातील बँकेच्या मुख्य शाखेकडे पोलिसांनी पत्र देऊन कागदपत्रांची मागणी केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा तपास डीवायएसपी बारी यांच्याकडे देण्यात आला. परंतु या प्रकरणातील तीन वर्षांच्या काळात संचालक मंडळ, शाखाधिकाऱ्यांची भूमिका याची पडताळणी करण्यात येत आहे. याबाबत शहरातील जेपीसीच्या मुख्य शाखेकडून काही कागदपत्र तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बारी म्हणाले. यासंदर्भात तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी म्हणाले की, दि जालना पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेच्या बदनापूर शाखेत शेतमजूर, हमालांच्या नावे बनावट खाते उघडून त्यांच्याच नावावर बनावट सोने तारण ठेवून १ कोटी ६२ लाखांचे कर्ज उचलण्यात आले आहे. या संदर्भात विविधअंगांनी तपास करून ठोस कारवाईसाठी योग्य दिशेने तपास सुरू असून, प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.(प्रतिनिधी)