शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

काठमांडूत अडकलेले डॉक्टर सुखरूप परतले

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

लातूर : नेपाळमधील भूकंपात अडकलेले लातूरचे तिन्ही डॉक्टर्स सुखरुप परतले. काठमांडू येथून सोमवारी पहाटे ४ वाजता विमानाने दिल्ली

लातूर : नेपाळमधील भूकंपात अडकलेले लातूरचे तिन्ही डॉक्टर्स सुखरुप परतले. काठमांडू येथून सोमवारी पहाटे ४ वाजता विमानाने दिल्ली व तेथून पुण्यापर्यंत तिघांनी विमानाने प्रवास केला़ त्यानंतरचा प्रवास खाजगी वाहनाने केला़ काठमांडू येथे २५ व २६ एप्रिल असे दोन दिवस बालरोगतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद होती़ त्यात लातूरचे डॉ़ दत्ता गोजमगुंडे आणि डॉ़ संदीपान साबदे हे सहभागी होते़ डॉ़ संदीपान साबदे यांच्या पत्नी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ़ क्रांती साबदे याही काठमांडुला गेल्या होत्या़ भूकंपामुळे हे तिघे डॉक्टर काठमांडूत अडकले़ परतीच्या प्रवासासाठी त्यांचे विमान निश्चित झाले नसल्याने त्यांना शनिवारी व रविवारी काठमांडू येथेच थांबावे लागले़ शिवाय, दुसऱ्या दिवशीही झालेल्या भूकंपामुळे आणि नैसर्गिक वातावरण योग्य नसल्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी परदेशातील विमाने काठमांडूच्या विमानतळावर उतरत नव्हती़ सोमवारी पहाटे ४ वाजता ते विमानाने दिल्लीकडे निघाले़ डॉ़दत्ता गोजमगुंडे हे विमानाने सोमवारी सकाळी ७ वाजता पुण्याला पोहोचले़ त्यानंतर ते खाजगी वाहनाने लातूरला आले आहेत. दरम्यान, विमान उपलब्ध झाले नसल्याने डॉ़ साबदे दाम्पत्यांना दिल्लीतच थांबावे लागले़ त्यानंतर अन्य विमानाने रात्री ९ वाजता ते पुण्यापर्यंत पोहोचले़ तेथून ते दोघे लातूरला येत आहेत़, अशी माहिती डॉ़वर्धमान उदगीरकर यांनी दिली़